BJP writes to Election Commission esakal
देश

BJP writes to EC: उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर कारवाईचे आदेश द्या! भाजपचे निवडणूक आयोगाला पत्र, काय आहे प्रकरण?

BJP writes to Election Commission: भाजपने उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Sandip Kapde

BJP writes to Election Commission: भाजपने भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. निवडणूक अधिकारी अत्यंत पक्षपातीपणा दाखवतात, भाजपने दाखल केलेल्या तक्रारींकडे विलंब किंवा दुर्लक्ष करताना किंवा परवानग्या आणि मंजूरी देण्यास विलंब करताना, असा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भाजपने उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील निवडणूक आयोगाकडे केली आहे.

सोशल मीडिया पोस्ट किंवा भाजपने निरिक्षत केलेल्या भाषणांकडे डोळेझाक केल्याची उदाहरणे भरपूर आहेत. मात्र निवडणूक आयोग भाजप सदस्यांवर कारवाई करण्यात अवाजवी घाई दाखवतो, कधी कधी औपचारिक तक्रारी नसतानाही कारवाई करण्यात येते असा आरोप भाजपने केला आहे.

शिवसेना (UBT) खासदार आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्रातील बुलढाणा येथे पक्षाच्या सभेत केलेल्या विधानाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी देखील भाजपने केली आहे.

आयोगाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदी आणि गुजरातच्या जनतेची बिनशर्त जाहीर माफी मागण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती भाजपने केली आहे. तसेच संजय राऊत विरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असे भाजपने पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT