देश

कर्नाटकात भाजपचे पुन्हा ‘ऑपरेशन कमळ’

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - सत्तास्थापनेसाठी २००८ मध्ये वापरलेले ‘ऑपरेशन कमळ’ तंत्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. अन्य पक्षातून भाजपत प्रवेश करू इच्छिणाऱ्या १३ आमदारांची यादी प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहे. तर खाणसम्राट जनार्दन रेड्डी यांनी ‘ऑपरेशन कमळ’ची जबाबदारी स्वीकारली असल्याचे समजते.

निवडणुकीनंतर लगेचच सरकार स्थापन केल्यानंतर भाजपला धजद व काँग्रेस आमदार फोडता आले नाहीत. मात्र काँग्रेस-धजद युती सरकार अस्तित्वात आल्यानंतर अनेक आमदार असंतुष्ट बनले आहेत. त्यांना जाळ्यात ओढण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. हे सरकार नोव्हेंबरपर्यंत टिकून राहणार नाही, असे स्पष्ट आश्वासन येडियुरप्पा यांनी पक्षश्रेष्ठींना दिले आहे. मात्र, कोणत्या पक्षाचे आमदार भाजप प्रवेश करणार यासाठी थोडी प्रतीक्षा करा. सोमवारनंतर किती आमदार पक्षप्रवेश करतील याची माहिती देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी पक्ष नेतृत्त्वाला दिली आहे. 

श्रीरामलूंना उपमुख्यमंत्रिपद
सरकार स्थापन करणे शक्‍य झाल्यास श्रीरामलू यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची ग्वाही निवडणुकीपूर्वीच दिली होती. निकटच्या मित्राला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार असल्याने रेड्डींनीही ऑपरेशन कमळसाठी पुढाकार घेतला आहे.

यावरुन भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ राबविण्याची संपूर्ण तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनंतकुमार, सदानंदगौडा, जगदीश शेट्टर, ईश्वरप्पा, अशोक यांच्यासह पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते ऑपरेशन कमळपासून दूर आहेत. मात्र, ‘ऑपरेशन कमळ’चा वापर करून सरकार स्थापन करण्याची घाई लागलेल्या येडियुरप्पा यांना खाणसम्राट जनार्दन रेड्डी व श्रीरामलू यांची समर्थ साथ लाभली आहे. काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांना ‘ऑपरेशन कमळ’च्या जाळ्यात अडकविण्याची योजना उभयतांनी आखली आहे. बंगळूरपासून दूर असलेल्या रिसॉर्टमध्ये बसून ते काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांशी संपर्क साधत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT