BJP's Rajib Banerjee returns to TMC at Tripura rally sakal media
देश

‘तृणमूल’च्या नेत्याची त्रिपुरात घरवापसी

जाहीर सभेच्या आयोजनाद्वारे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सूचक इशारा

सकाळ वृत्तसेवा

आगरताळा : ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्र्याची घरवापसी तृणमूल काँग्रेसने त्रिपुरात जाहीर सभेद्वारे साजरी केली. याद्वारे विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील आणि राज्यातील भाजपला सूचक इशारा देण्याचा ममता यांचा उद्देश होता.

ममता यांनी नुकताच गोवा दौरा केला. त्यावेळी त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. गोवा किंवा त्रिपुरा अशा कोणत्याही ठिकाणी आपले कडवे आव्हान भाजपसमोर असेल हेच दाखवून देण्याचा तृणमूलचा निर्धार आहे. बॅनर्जी यांच्यासाठी आयोजित सभेस तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते. बॅनर्जी यांनी ममता यांच्या छायाचित्राची फ्रेम छातीपाशी धरली होती.दुर्गापूजा उत्सवानंतर कोलकत्यात राजकीय क्षेत्रात शांतता आहे. अशावेळी त्रिपुरासारख्या घडामोडी घडत असलेल्या ठिकाणी ही जाहीर सभा घेण्याची रणनीती आखण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर तृणमुलचा महत्त्वाचा मोहरा भाजपने फोडला होता. ते डोमजूरचे आमदार होते. भाजपने त्यांना तेथूनच तिकीट दिले, पण त्यांचा पराभव झाला.

बॅनर्जी यांनी अलीकडेच अभिषेक यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळीच त्यांची घरवापसी निश्चीत असल्याचे स्पष्ट झाले होते. तृणमूलमधून बाहेर पडल्यानंतर भाजपकडून जिंकलेल्या पाच विद्यमान आमदारांची यापूर्वीच घरवापसी झाली आहे.बॅनर्जी यांनी वरिष्ठ नेते मुकुल रॉय यांच्यासह अनेकदा ईशान्येकडील राज्यांचा दौरा केला आहे. त्रिपुरात पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी रॉय यांच्यावर होती. यासाठी बॅनर्जी यांनी त्यांना बरीच मदत केली. त्यामुळे त्यांचा त्रिपुरातील राजकीय संपर्क उल्लेखनीय आहे. रॉय यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बॅनर्जी यांच्यावर मदार असेल. त्रिपुरात २०२३ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी बिप्लब देब यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला शह देण्याचा तृणमूलचा निर्धार आहे.

शहा यांच्या उपस्थितीत...

राजीब बॅनर्जी यांनी जानेवारीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना खास विमानाने दिल्ली नेण्यात आले होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला होता, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपमध्ये गेल्यानंतर थोड्याच दिवसांत बॅनर्जी यांना आपली चूक झाल्याचे जाणवले.

परवानगीचा मुद्दा

सभेसाठी तृणमूलचा सप्टेंबरपासून प्रयत्न सुरु होता. शनिवारी सुद्धा पोलिसांनी कोविडचे कारण देत चौथ्यांदा परवानगी नाकारली. त्यामुळे तृणमूलने न्यायालयात धाव घेतली. शनिवारी उशिरा उच्च न्यायालयाने परवानगी दिली, पण कमाल ५०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली. समारंभानंतर अज्ञात व्यक्तींनी धुडगूस घातला. तृणमूलचे झेंडे आणि पोस्टर खाली उतरवून फाडण्यात आले.

‘डाव्यांना संपवू अन्् उजव्यांनाही‘

या समारंभात त्रिपुरातील भाजप आमदार आशिष दास यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला. सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सभेत आक्रमक भाषण केले. बंगालमधील निकालाची पुनरावृत्ती त्रिपुरात होईल. डाव्यांना आम्ही संपवू आणि उजव्यांचीही तीच गत होईल, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या विषाणूवर एकच लस आहे आणि ती म्हणजे ममता बॅनर्जी, असेही ते म्हणाले. पुढील महिन्यातील स्थानिक स्वराज्या संस्थांच्या सर्व जागा लढवू असेही त्यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT