देश

'चला, वाजवा थाळ्या', ब्लॅक फंगससाठीही मोदी लवकरच करतील घोषणा

विनायक होगाडे

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे माजी खासदार राहुल गांधी यांनी कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीवरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राहुल गांधी यांनी कोरोनासहित वाढत्या ब्लॅक फंगस आजारावरुन देखील सरकारला धारेवर धरलं आहे. हा आजार पसरण्यामागे सरकारची अनास्था आणि अनागोंदी कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरुन शालजोडीतून टोला देखील हाणला आहे.

केंद्राच्या अनास्थेमुळे पसरला कोरोना

राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटलंय की, मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळेच फक्त भारतातच कोरोनासोबतच ब्लॅक फंगसची महामारी वाढत आहे. लशीचा तुटवडा तर पहिल्यापासून आहेच, मात्र या नव्या महामारीवरील औषधाचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. या आजाराशी लढण्यासाठी देखील पंतप्रधान आता टाळ्या आणइ थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील, असं म्हणत त्यांनी हा टोला लगावला आहे.

कोरोना आणि देशातील विदारक परिस्थितीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी नेहमीच मोदी सरकारला घेरत असतात. याआधी काल शुक्रवारी देखील राहुल गांधी यांनी देशातील लसीकरणाच्या परिस्थितीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी एक आकडा जाहीर केला होता, ज्या आकडेवारीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 च्या लोकसंख्येमागे 20 पेक्षाही कमी डोस प्राप्त झाले आहेत. हे आकडे सांगत राहुल गांधी यांनी लिहलं होतं की, मिस्टर मोदी, लोकांचं लसीकरण करा, उशीर नका करु!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT