CM Nitish Kumar esakal
देश

मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या सुरक्षेत मोठी चूक; 15 फूट अंतरावर झाला स्फोट

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं प्रकरण समोर आलंय.

बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं प्रकरण समोर आलंय. मुख्यमंत्र्यांची जनसंवाद कार्यक्रमात उपस्थिती असताना स्फोट झाल्याची माहिती समोर आलीय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नालंदा इथं एका जनसंवाद कार्यक्रमाला हजेरी लावली होती, त्यावेळी त्यांच्यापासून केवळ 15 ते 18 फूट अंतरावर स्फोट झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यासपीठाच्या मागे एका तरुणानं फटाका फोडला असून या तरुणाला अटक करण्यात आलीय. हा तरुण इस्लामपूरचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनसंवाद कार्यक्रमात आज नालंदामध्ये चार कार्यक्रम होत आहेत. या अंतर्गत हा तरुण सिलाव इथं पोहोचला होता. दरम्यान, त्यानं स्टेजच्या मागे काही फटाके फोडले आहेत.

तरुणाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं असून अटक करण्यात आलेला तरुण शुभम आदित्य हा इस्लामपूरच्या सत्यरगंज गावचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री त्याचं म्हणणं ऐकत नव्हते, त्यामुळं त्यानं लक्ष वेधण्यासाठी फटाके फोडल्याचं सांगितलं जात आहे. अटक करण्यात आलेला तरुण इस्लामपूरमधील बीएस्सी पदवीधर महाविद्यालयात शिकत आहे. यापूर्वी बख्तियारपूरमध्ये सीएम नितीश कुमार यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT