देश

"भारतीयांचा एक दिवा देशातल्या जवानांसाठी असेल"; PM मोदींची सैनिकांसोबत दिवाळी

सकाळ डिजिटल टीम

नौशेरा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली दिवाळी सैनिकांसोबत साजरी करतात. नेहमीप्रमाणे ते या दिवाळीला देखील जम्मूमधील नौशेरामध्ये पोहचले आहेत. पंतप्रधान मोदी राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये सैनिकांसमवेत दिवाळीचा उत्साह द्विगुणित करत आहेत. आज मी माझ्यासोबत तुमच्यासाठी 130 कोटी देशवासीयांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. या देशाचे तुम्ही सैनिक म्हणजे भारतमातेचे सुरक्षा कवच आहात, तुमच्यामुळेच देशवासीय निश्चिंतपणे झोपू शकतात, असं त्यांनी म्हटलंय.

सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी या नौशेरा ब्रिगेडने बजावलेल्या भूमिकेबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो, असं मोदींनी म्हटलंय. पुढे ते म्हणाले की, मी प्रत्येक दिवाळी देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत साजरी केली आहे. आज मी माझ्यासोबत तुमच्यासाठी 130 कोटी देशवासीयांच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. या देशाचे तुम्ही सैनिक म्हणजे भारतमातेचे सुरक्षा कवच आहात, तुमच्यामुळेच देशवासीय निश्चिंतपणे झोपू शकतात, असं त्यांनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी प्रत्येक दिवाळी सीमेवर तैनात तुम्हा सैन्यासोबत साजरी केली आहे. तुमच्याशी निगडीत आनंद आणि उत्साह, विश्वास घेऊन मी इथून परतेन. मी एकटा आलो नाहीये तर मी माझ्यासोबत 130 कोटी देशवासीयांच्या आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलोय. आज सायंकाळी दिवाळीचा एक दिवा तुमच्या शौर्यासाठी पराक्रम आणि त्यागासाठी भारताचा प्रत्येक नागरिक लावून सदिच्छा देईल, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे ते म्हणाले की, आज तुम्ही घरच्यांशी बोलाल, फोटो पाठवाल, यावेळची दिवाळी वेगळी होती, असं म्हणाल. कारण मी तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून आलोय. तुम्ही देशाचे वीर, वीर मुली भारतमातेची अशी सेवा करत आहेत, ज्याचं सौभाग्य काहींनाच मिळतं. ते तुम्हाला मिळालं आहे. तुमच्या चेहऱ्यावरील ते मजबूत भाव मी पाहू शकतोय. संकल्पाचा भाव, पराक्रम करण्याची भावना आहे. हिमालय असो वा वाळवंट, बर्फ असो वा खोल पाणी, कुठेही तुम्ही भारत मातेचा जीवंत सुरक्षा कवच आहात, असं मोदींनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT