New Education Policy sakal
देश

New Education Policy : वर्षात दोन वेळा बोर्डाच्या परीक्षा; 11वी, 12वीत शिकाव्या लागणार दोन भाषा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - Board Exam: शिक्षण मंत्रालय, 2024 पासून अभ्यासक्रमात मोठे बदल करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) नवीन अभ्यासक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. आता 2024 च्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहे.

शिक्षण मंत्रालयाने म्हटले की नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता 11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल, त्यापैकी किमान एक भारतीय भाषा अनिवार्य असेल.

शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण कायम ठेवण्याची परवानगी दिली जाईल. शिक्षण मंत्रालयाच्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यांतर्गत, बोर्ड परीक्षासाठीच्या अनेक महिन्यांचे कोचिंग आणि रट्टा मारत अभ्यास करण्याच्या क्षणतेऐवजी विद्यार्थ्यांच्या आकलन आणि प्रावीण्यचे मूल्यांकन करेल.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता 11आणि 12मधील विषयांची निवड 'स्ट्रीम'पूर्ती मर्यादित राहणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. तसेच वर्गाखोल्यांमध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम संपवण्याची प्रथा यामुळे संपुष्टात येईल. शिवाय पाठ्यपुस्तकांच्या किंमती खाली येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

चालू सीझरमध्येच डॉक्टरांनी मला प्रश्न विचारला की... मराठी अभिनेत्रीने सांगितला डिलिव्हरीचा तो अनुभव

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

SCROLL FOR NEXT