board recommendation CBI investigation Railway adminstration out driver error or system failure in Odisha train accident esakal
देश

Odisha Train Accident : रेल्वेअपघातामागे घातपात? ‘सीबीआय’ चौकशीची ‘बोर्डा’ची शिफारस

ओडिशामध्ये झालेल्या रेल्वेअपघातामागे चालकाची चूक किंवा यंत्रणेतील बिघाडाची शक्यता रेल्वेने फेटाळली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ओडिशामध्ये झालेल्या रेल्वेअपघातामागे चालकाची चूक किंवा यंत्रणेतील बिघाडाची शक्यता रेल्वेने फेटाळली आहे. या घटनेमागे घातपात आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये फेरफार ही त्यामागील कारणे असू शकतात. दरम्यान, या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची शिफारस रेल्वे बोर्डाने केली आहे.

‘‘रेल्वे अपघाताचे मूळ कारण आणि त्याला कारणीभूत असलेले ‘गुन्हेगार’ यांची माहिती मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि पॉइंट मशिन यांत फेरफार केल्यामुळे दुर्घटना घडली आहे,’’ अशी माहिती रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी आज बालासोर जिल्ह्यातील घटनास्थळावरून बोलताना दिली.

दिल्लीमध्ये बोलतानाही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पॉइंट मशिन आणि इंटर लॉकिंग सिस्टिम कशी काम करते याची माहिती दिली. या यंत्रणा ‘बिनचूक’ आणि ‘बिघाड मुक्त’ आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र यात मुद्दाम कोणी बदल केल्याची शक्यता त्यांनी फेटाळली नाही.

रेल्वे बोर्डाच्या ‘ऑपरेशन’ व बिझनेस डेव्हलपमेंट विभागाच्या सदस्या जया वर्मा या बाबत बोलताना म्हणाल्या, ‘‘फेल सेफ किंवा बिघाडमुक्त याचा अर्थ यंत्रणा जरी बंद पडली, तरी त्याची सूचना लगेच मिळेल, सर्व सिग्नलचे लाल दिवे लागतील आणि सर्व रेल्वे गाड्या जागच्या जागी थांबतील.

रेल्वेमंत्र्यांनी सिग्नल यंत्रणेबाबत वर्तविलेल्या शक्यतेनुसार कोणीतरी माहिती नसताना खणले असेल, त्यात सिग्नलच्या केबलचे नुकसान झाले असू शकते. कोणतेही यंत्र म्हटले की त्यात बिघाडाची शक्यता असतेच.’’ रेल्वे सुरक्षा आयुक्तांनीही अपघाताबाबतचा तपास केला आहे. त्यांचाही अहवाल सादर व्हायचा आहे.

असा झाला अपघात

‘‘बहनगा रेल्वेस्थानकावर एकूण चार लोहमार्ग आहेत. त्यापैकी मधल्या दोन मार्गांवर कोणतीही रेल्वे थांबत नाही. बहनगा रेल्वेस्थानकावर न थांबता पुढे जाणाऱ्या रेल्वे या दोन मार्गांवरून ये-जा करतात. तर दोन बाजूला असणारे दोन मार्ग या बहनगा रेल्वेस्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांसाठी आहेत. यांना लूप लाइन्स म्हटले जाते.

अपघात झाला तेव्हा दोन्ही बाजूच्या दोन लूप लाइन्सवर दोन गाड्या आधीपासून उभ्या होत्या. त्यापैकी एका लाइनवर मालगाडी होती. बहनगा रेल्वेस्थानकावर न थांबणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी मधल्या दोन लाइन्स उपलब्ध होत्या. यावेळी चेन्नईवरून बंगळूरमार्गे हावड्याला जाणारी यशवंतपूर एक्स्प्रेस येत होती.

तर दुसऱ्या बाजूने चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस येत होती. दोन रेल्वेगाड्यांसाठी दोन लोहमार्ग मोकळे होते. दोन्ही गाड्यांसाठी हिरवा सिग्नल होता. कोरोमंडल एक्स्प्रेस १३० किलोमीटर प्रति तास ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अपघाताच्या वेळी ही रेल्वे १२८ किमी प्रति तास इतक्या वेगाने धावत होती. तर दुसऱ्या बाजूने यशवंतपुरा एक्स्प्रेस १२६ किलोमीटर प्रतितास या वेगाने येत होती. या गाडीसाठीही १३० किमी प्रति तास ही वेगमर्यादा निश्चित केली आहे, म्हणजे या दोन्ही गाड्या त्यांच्या वेगाच्या मर्यादेत मार्गक्रमण करत होत्या,’’ अशी माहिती जया वर्मा यांनी दिली.

कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरली आणि काही डबे शेजारील मालगाडीवर जाऊन आदळले. मालगाडी वजनदार असल्याने जागची हालली नाही. उलट कोरोमंडलचे काही डबे मालगाडीच्या वर गेले. या अपघातानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे इकडे तिकडे पडले.

या गाडीचे दोन डबे बाजूच्या लोहमार्गावर पडले. या मार्गावरून यशवंतपुरा एक्स्प्रेस जाणार होती. मार्गात पडलेल्या डब्यांवर यशवंतपुरा एक्स्प्रेस धडकली. त्यामुळे यशवंतपुरा एक्सप्रेसचादेखील अपघात झाला, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT