Board that provides technical and logistical support for Social Nutrition Program was officially dissolved Sakal
देश

अन्न आणि पोषण आहार मंडळ विसर्जित; सुसूत्रीकरणाच्या मोहिमेला वेग; मालमत्तांची विक्री शक्य

या मंडळाचे देशभर मोठे नेटवर्क असून त्यामध्ये चार प्रादेशिक कार्यालये आणि फरिदाबाद, मुंबई, कोलकता आणि चेन्नई येथील गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांचा समावेश होतो.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : विविध सरकारी विभागांच्या कामकाजामध्ये सुसूत्रीकरण आणण्यासाठी केंद्र सरकारने वेगाने पावले टाकायला सुरुवात केली आहे. सामाजिक पोषण आहार कार्यक्रमासाठी तांत्रिक आणि लॉजिस्टिक आधार देणारे मंडळ आज अधिकृतरीत्या विसर्जित करण्यात आले.

महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने अन्न आणि पोषण आहार मंडळ (एफएनबी) बंद केले आहे. हे मंडळ मंत्रालयाचा तांत्रिक विभाग म्हणून काम करत होते. त्याचे मुख्यालय हे दिल्लीमध्ये होते.

या मंडळाचे देशभर मोठे नेटवर्क असून त्यामध्ये चार प्रादेशिक कार्यालये आणि फरिदाबाद, मुंबई, कोलकता आणि चेन्नई येथील गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांचा समावेश होतो. मंत्रालयाने सोमवारी याबाबतची अधिकृत अधिसूचना काढली आहे. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या नोव्हेंबर २०२० च्या अहवालामध्ये सरकारी विभागांच्या एकत्रीकरणाची शिफारस करण्यात आली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यावर शिक्कामोर्तब देखील केले होते.

‘एफएनबी’, ‘राष्ट्रीय महिला कोश’ आणि केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळ बंद करण्याची तसेच त्याचे एकत्रीकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडून करण्यात आली होती.

देशभर ४३ केंद्रे

अन्न पोषण आहार मंडळाची देशभर ४३ केंद्रे कार्यरत होती. ती देखील तांत्रिक आणि लॉजिस्टिकच्या आधाराचे काम करत होती. आता हे मंडळ बंद करण्यात आल्याने त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड कोसळणार असून, या विभागांच्या मालमत्तांची विक्री होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत पुन्हा बिबट्याची दहशत, पीडीएमसी परिसरात दिसल्या पाऊलखुणा, वनविभागाकडून शोधमोहीम

राजुरा हत्याकांड प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत कबुली, नेमकं काय म्हणाले?

Latest Marathi News Update : कुख्यात गुंड मंगेश मडावी पोलिसांच्या जाळ्यात,सुजातपूरमधून अटक, ‘मोक्का’अंतर्गत कारवाई

Agriculture Loss By Rain : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे यांचे आदेश

Pune News : निधी येऊनही शहरात पाणी का साठते? केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांकडून प्रशासनाची झाडाझडती

SCROLL FOR NEXT