J-K Esakal
देश

J-K: श्रीनगरच्या झेलम नदीत बोट बुडाली, 10 विद्यार्थ्यांसह अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू

J-K: श्रीनगरच्या बटवार येथील झेलममध्ये प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली. या बोटीमध्ये 10 ते 12 शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण प्रवास करत होते. अनेक जण बेपत्ता आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

श्रीनगरच्या बटवार येथील झेलममध्ये प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली. या बोटीमध्ये 10 ते 12 शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण प्रवास करत होते. अनेक जण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक विद्यार्थी आणि स्थानिकांना घेऊन गंडबाल ते बटवारा, श्रीनगरला जाणारी एक बोट आज पहाटे मध्य काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बटवारा भागाजवळ झेलम नदीत उलटली.

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये झेलम नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात काही लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. मंगळवारी शहराच्या बाहेरील झेलम नदीत एक बोट उलटली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघातात काही जण बेपत्ता झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक लोक SDRF आणि इतर अधिकाऱ्यांना त्वरीत बचावकार्य सुरू केले आहे.

या बोटीमध्ये 10 ते 12 शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण होते. अनेकजण बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.

बटवाडा गंडाबल परिसरातील स्थानिकांनी इंडिया टुडेला सांगितले की, स्थानिक अल्पवयीन आणि इतर मुलांना घेऊन जाणारी बोट मंगळवारी सकाळी उलटली. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून इतरांना उपचारासाठी श्रीनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव कार्य सुरू करण्यात आले असून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेलमसह अनेक जलकुंभांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

अनेक दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच आहे. त्यामुळेच नद्यांच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पूंछ-राजौरी जिल्ह्यांना थेट काश्मीरशी जोडणाऱ्या मुघल रोडवर पुन्हा बर्फवृष्टी झाली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. वरच्या भागात बर्फवृष्टी होत आहे, तर सखल भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे. येत्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्येही अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

पुन्हा अलर्ट जारी

या काळात उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असतो. आजही हवामान खात्याने वरच्या भागात हिमवृष्टीचा आणि खालच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 20 एप्रिलपासून खोऱ्यात पुन्हा हवामानात बदल होणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT