देश

DGCA ने 90 पायलट्स बोइंग 737 मॅक्स उड्डाण करण्यापासून रोखलं

या वैमानिकांना नोएडा येथील एका सुविधेत सिम्युलेटरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 90 स्पाईसजेट वैमानिकांना योग्य प्रशिक्षण मिळेपर्यंत बोईंग 737 MAX उड्डाण करण्यास मनाई केली आहे. सिम्युलेटर प्रशिक्षणातील त्रुटी लक्षात आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हे पाऊल उचलले आहे. या वैमानिकांना नोएडा येथील एका सुविधेत सिम्युलेटरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

भारताचे विमान वाहतूक नियामक अरुण कुमार यांनी एक वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसर या (90) वैमानिकांना बोईंग 737 MAX उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे. DGCA च्या समाधानासाठी या संबंधित वैमानिकांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. एवढेच नसून एका घटनेनंतर विमान कंपनीचे पायलट प्रशिक्षणही कायदेशीर रित्या होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, स्पाईसजेटच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, डीजीसीएने 90 वैमानिकांच्या प्रशिक्षण प्रोफाइलवर निरीक्षण केले होते. त्यामुळे डीजीसीएच्या सूचनेनुसार स्पाइसजेटने 90 वैमानिकांना मॅक्स विमानांचे उड्डाण करण्यापासून रोखले आहे. या वैमानिकांना डीजीसीएच्या समाधानासाठी पुन्हा प्रशिक्षण दिले जाणार आहे.

एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, स्पाईसजेटच्याच्या ताफ्यात सध्या 13 Boeing 737 MAX विमाने आहेत. ज्यापैकी 11 विमानांचे उड्डाण होते. सध्याच्या माहितीनुसार स्पाईसजेटजवळ MAX विमानांसाठी 560 प्रशिक्षणार्थी वैमानिक आहेत. त्यामुळे येथे आवश्यकतेपेक्षा वैमानिकांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT