देश

‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

नामदेव कुंभार

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सतत श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्यामुळे दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वी मुंबईच्या हिदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो यांनी सोमवारी प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं म्हटलं होतं. पण, बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. 29 जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान (Mohammed Yusuf Khan) असं होतं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता. 1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जातं.

सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं होतं. पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी मुघल-ए-आजम, देवदास, नया दौर, ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’. राम और श्याम असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी आठ वेळा पटकावला आहे. केंद्र सरकारने १९९४ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अतुलनीय कारकिर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार बहाल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT