Bomb mistaken for ball kills  esakal
देश

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Bomb caught by mistaking the ball ... 13-year-old boy dies in explosion; पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यात झालेल्या स्फोटात एका बालकाचा मृत्यू झाला. मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला, यानंतर मोठा स्फोट झाला.

Sandip Kapde

बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील पांडुआ येथे सोमवारी झालेल्या स्फोटात एका 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्याचे दोन मित्र देखील गंभीर झाले आहेत. खेळताना मुलांनी बॉल समजून बॉम्ब उचलला. यानंतर मोठा स्फोट झाला, त्यात एका मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या हातातच बॉम्बचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मुले खेळत होती. दरम्यान, एका मुलाने बॉल समजून चुकून हातातला बॉम्ब उचलला. हा बॉम्ब हातातच फुटला आणि यादरम्यान एकत्र खेळणाऱ्या अनेक मुलांना त्याचा फटका बसला. एका मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली, त्यामुळे मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

11 वर्षीय राज विश्वास याला उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर एका मुलाला हात गमवावा लागला. बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण परिसर हादरला असून लोक आपापल्या घरात लपून बसले आहेत. हुगळीत हा बॉम्बस्फोट अशा वेळी झाला जेव्हा येथे काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.

पांडुआ नेताजी कॉलनीतील रुपम यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या तलावाजवळ इयत्ता सहावीचा विद्यार्थी राज विश्वास हा रुपम बल्लभ (११) आणि सौरव चौधरी (१२) यांच्यासोबत खेळत असताना सकाळी ८.३० च्या सुमारास हा स्फोट झाला.

“आम्हाला पालकांकडून दोन व्यक्तींविरुद्ध तक्रार मिळाली आहे आणि त्यापैकी एकाला, रिटा बल्लभला अटक केली आहे. दुसऱ्याचा शोध सुरू आहे आणि त्यांनी स्फोटके कोठून आणि कोणत्या हेतूने पकडली होती, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे हुगळीचे ग्रामीण पोलीस अधिक्षक कमनाशिष सेन यांनी सांगितले. (West Bengal News in Marathi)

२० मेच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि टीएमसीने सुरुवातीला एकमेकांवर स्फोटकांचा साठा केल्याचा आरोप करून दोषारोपाचा खेळ सुरू केला, तर पोलिसांनी नंतर स्पष्ट केले की बॉम्ब एका मुलाच्या वडिलांना लक्ष्य करण्यात आला होता आणि त्याच्या एक्स वाईफला अटक करण्यात आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT