Private Schools in Bangalore esakal
देश

Private School : आठ शाळांना बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा E-mail; शहरात भीतीचं वातावरण, पोलिस प्रशासन सतर्क

बंगळुरातील आठ खासगी शाळांना बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

‘कोर्ट’ नावाच्या एका गटाचा या धमकीमागे हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बंगळूरमधील शाळांना यापूर्वीही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल आले आहेत.

बंगळूर : बंगळुरातील आठ खासगी शाळांना बॉम्बच्या धमकीचे ई-मेल मिळाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळांना धमकीच्या ई-मेलची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब निकामी पथकांनी घटनास्थळी भेट देऊन कसून पाहणी केली; मात्र स्फोटके सापडली नाहीत. नंतर ही बॉम्बची धमकी बनावट असल्याचे समोर आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बंगळूर स्कॉटिश स्कूल, भवन बंगळूर प्रेस स्कूल, चित्रकूट स्कूल, दीक्षा हायस्कूल, एडिफाई स्कूल, गंगोत्री इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, गिरीधनवा स्कूल आणि जैन हेरिटेज स्कूल यांना धमकीचे ई-मेल आल्याचे सांगण्यात आले. शाळेच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आला आहे.

काही तासांत त्याचा स्फोट होईल, अशी ई-मेलमध्ये धमकी दिली होती. ‘कोर्ट’ नावाच्या एका गटाचा या धमकीमागे हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बंगळूरमधील शाळांना यापूर्वीही अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल आले आहेत. एकाच वेळी २०-३० शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे संदेश आल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laborers Truck Accident: मोठी घटना! मजुरांनी भरलेला ट्रक हजार फूट खोल दरीत कोसळला; २२ जणांचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या नाशिक विभागाची मोठी कारवाई

Pimpalgaon Baswant : हृदयद्रावक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पिंपळगावात ४ वर्षांच्या चिमुकल्याचा बळी, रेबीजने मृत्यू

Kokan Weather Update : थंडीची लाट आणखी तीव्र होणार, सिंधुदुर्गमध्ये ९ अंश निचांकी तापमान, आंबा पिकाचे उत्पादन वाढणार

Nashik Municipal Elections : सिडकोतील प्रबळ लढत! महाविकास आघाडीचा बालेकिल्ला झाला महायुतीचा गड; शिंदे गट विरुद्ध भाजप संघर्ष अटळ

SCROLL FOR NEXT