JOhnson and Johnson Sakal
देश

Bombay HC : जॉन्सन अँड जॉन्सन पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवली; हायकोर्टाचा दिलासा

उत्पादन सुरू ठेवण्याची परवानगी होती, मात्र विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. या कंपनीच्या बेबी पावडरच्या विक्रीवरची बंदी उठवण्यात आली आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीचा बेबी पावडर बनवण्याचा परवाना रद्द करण्यासाठीची महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आता या कंपनीला पावडरचं उत्पादन करता येणार असून विक्रीवरची बंदीही हटवण्यात आली आहे.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एसजी ढगे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विनाकारण या प्रकरणात दिरंगाई करत आहे, अशी टिप्पणी कोर्टाने केली आहे. तर मुंगी मारण्यासाठी आपण हातोडा वापरू शकत नाही, असं विधानही न्यायालयाने केलं आहे. एक सँपल स्टँडर्ड क्वालिटीचं नाही, म्हणून परवानाच रद्द करणं हे कठोर पाऊल असेल, असंही कोर्टाने नमूद केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT