booster dose Sakal
देश

सर्वांनाच बूस्टर डोस

आरोग्य मंत्रालयाचे दिशानिर्देश; उद्यापासून लसीकरण

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अन्य देशांतील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकार सावध झाले असून आता येत्या रविवारपासून (ता.१०) खासगी लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून अठरा वर्षांवरील सर्वच नागरिकांना तिसरा कोरोना प्रतिबंधात्मक लशीचा डोस उपलब्ध करून देण्यात येईल असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज जाहीर करण्यात आले. आतापर्यंत देशातील १९४ कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

देशात कोरोना संसर्ग कमी होत असला तरीसुद्धा प्रौढ नागरिकांनी बूस्टर डोस अवश्य घ्यावा असा सल्ला देण्यात आला आहे. या लसीचा दुसरा डोस घेऊन ९ महिने झालेत अशा १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी आता खासगी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांवर बूस्टर डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिक तेथूनही लस घेऊ शकतात. सध्या सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य सेवक, कोरोना योद्धे व ६० वर्षांपुढील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहेत. आता येत्या रविवारपासून खासगी रुग्णालयांतही नागरिकांसाठी डोस उपलब्ध करून दिले जातील.

लसीकरण ऐच्छिकच

सन २०२१ च्या अखेर पर्यंत देशातील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण होणारच, असा विडा केंद्र सरकारने उचलला होता. आता ते उद्दिष्ट पूर्ण साध्य न झाल्याने सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली आहे. आताही हे लसीकरण पूर्णतः ऐच्छिक असल्याचे सांगण्यात आले आहे. लोकांवर सक्ती न करता जनजागृती व संवादाच्या मार्गाने लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यात सरकार यशस्वी ठरले आहे, अशी भूमिका केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी ‘सकाळ'' शी बोलताना मांडली.

आतापर्यंत देशातील १९४ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे असे सांगून डॉ. पवार म्हणाल्या की, पहिला डोस घेतलेले ९९ कोटी, दोन्ही डोस घेतलेले ८३ कोटी व बूस्टर डोस घेतलेले २ कोटी नागरिक आहेत. पूर्ण लसीकरण झालेल्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून केंद्राच्या जनजागृती मोहिमेचा व पंतप्रधानांनी स्वतः वारंवार केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम लसीकरण मोहिमेवर झाल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाचा ‘एक्स ई‘ हा नवा व्हेरिएंट अलिकडेच मुंबईमध्ये आढळला. पुण्याच्या प्रयोगशाळेत त्याचे नमुने पाठविण्यात आले आहेत. तपासणीनंतर येत्या २-४ दिवसांत त्याचा अहवाल येईल त्यानंतर केंद्र नवीन व्हेरियंटबाबत राज्यांना दिशानिर्देश जारी करेल.

- भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

IPL 2026: ऋतुराज गायकवाडला संजू सॅमसनमुळे CSK संघात जाणवतोय धोका? माजी कर्णधाराचा खळबजनक दावा

Gemma 4 : इंटरनेटची गरज संपली! गुगलने लॉन्च केले Gemma 4; आता डेटा संपला तरी मोबाईल चालेल सुपरफास्ट, कसं वापरायचं पाहा

Gold Rate: सोनं 30 हजारांनी स्वस्त! चांदीही 1.6 लाखांनी घसरली; आता भाव वाढणार की अजून पडणार?

Parbhani News: ही तर दिवसाढवळ्या परभणीकरांची लूटच!; टॅंकर माफियांकडून नागरिक वेठीस; हजार लिटरसाठी घेताहेत ५०० रुपये

SCROLL FOR NEXT