देश

युक्रेन प्रश्न, इंडो-पॅसिफिक, लष्करी करार आणि बरंच काही! मोदी-जॉन्सन यांच्यात काय झालं?

सकाळ डिजिटल टीम

युक्रेनमधला हिंसाचार थांबवणं, हवामान आणि उर्जासंबंधीची भागीदारी अधिक घट्ट करणं आणि इंडो पॅसिफिक भाग खुला आणि मुक्त ठेवणं अशा प्रमुख मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी चर्चा केली. बोरिस जॉन्सन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. ते सध्या गुजरातमध्ये आहे.भारत आणि ब्रिटनने नवीन लष्करी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली तर या वर्षाच्या शेवटी मुक्त व्यापार करारावर लक्ष केंद्रीत करण्याबद्दलचीही बोलणी या दोघांमध्ये झाली.

  • युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम आणि समस्येवर तोडगा काढण्यासाठी संवाद साधून मुत्सद्देगिरीने तोडगा काढण्यावर भर दिला. सगळ्या देशांचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या महत्त्वाचा आम्ही पुनरुच्चार केला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं.

  • बोरिस जॉन्सन यांनी नुकतीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडेमिर झेलेन्स्की यांची क्यीव इथं भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा भारत दौरा महत्त्वाचा ठरतो. ब्रिटन सातत्याने रशियाला हिंसाचार थांबवण्याचं आवाहन करत आहे.

  • पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान होणारी भारत भेट ऐतिहासिक आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारताच्या स्वागताने आपण भारावून गेलो असल्याचं बोरिस जॉन्सन यांनी सांगितलं.

  • दोन्ही राष्ट्रांनी मुक्त इंडो पॅसिफिक भागाची गरज व्यक्त केली. गेल्या वर्षीपासून निरकुंश बळजबरीच्या धमक्या अधिकच वाढल्या आहेत. त्यामुळे इंडो पॅसिफिक भाग मुक्त आणि खुला ठेवण्यासाठी एकमेकांचं सहकार्य अधिक बळकट करायला हवं. यासाठीची ही नवी भागीदारी दीर्घकालीन वचनबद्धता असेल, असं बोरिस जॉन्सन म्हणाले.

  • ब्रिटन भारताला फायटर जेट तयार करण्यासाठी मदत करेल, असंही बोरिस जॉन्सन म्हणाले आहेत.

  • या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानच्या प्रश्नांवरही प्रकाश टाकला. अफगाण प्रदेशाचा वापर इतर देशांमध्ये दहशतवाद पसरवण्यासाठी केला जाऊ नये हे गरजेचं आहे, असंही मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT