Aprna Yadav and dimple yadav
Aprna Yadav and dimple yadav 
देश

मुलायमसिंह यांच्या मतदार संघात दोन्ही सूनबाई आमने-सामने? दोन जावांमध्ये होणार लढत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील मैनपुरी पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने मुलायम सिंह यांच्या सूनबाई डिंपल यादव यांना उमेदवारी दिली आहे, तर मुलायमसिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यांच्या पत्नी अपर्णा यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपने अपर्णा यांना उमेदवारी दिल्यास मैनपुरी मतदारसंघात दोन जावा-जावांमध्ये लढत होणार आहे.

अपर्णा यादव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना वेग आला आहे. गुरुवारी सायंकाळी ही बैठक झाली. अपर्णा यादव यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. मात्र, अपर्णा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चौधरी यांच्यात काय खलबतं झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

मुख्यमंत्री योगी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी प्रदेश भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. या बैठकीत मैनपुरीच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा होणार आहे. मात्र, उमेदावारी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक समितीकडून निश्चित होणार आहे.

दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अपर्णा यादव यांच्या नावाची चर्चा नसून गेल्यावेळी निवडणूक लढवलेल्या प्रेमसिंग शाक्य यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT