Jammu-Kashmir file photo
देश

जम्मू-काश्मीर हायवेजवळ स्फोट; एका मुलासह दोघे जखमी

कार्तिक पुजारी

जम्मू-काश्मीर जिल्ह्यातील बनिहाल शहराजवळ जम्मू-काश्मीर राष्ट्रीय राजमार्गावर स्फोट झाला आहे. यात एका सोळा वर्षीय मुलासह दोघेजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर जिल्ह्यातील बनिहाल शहराजवळ जम्मू-काश्मीर राष्ट्रीय राजमार्गावर स्फोट झाला आहे. यात एका सोळा वर्षीय मुलासह दोघेजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, स्फोट शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास एमजी कन्स्ट्रक्शन साईटवर झाला. यामध्ये उधमपुरचे गोपाल शर्मा (35) आणि मंगित खारीचे मोहम्मद आकिब (16) जखमी झालेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय. (National Jammu Kashmir News)

पोलिसांनी सांगितलं की, स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही. पण, ग्रॅनेड हल्ला असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की पोलीस आणि सुरक्षा दलांनी तत्काळ संपूर्ण परिसराचू घेराबंदी केली. स्फोट एमजी कंपनीचे कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ झाला. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी ग्रॅनेड फेकल्याची शक्यता आहे.

एमजी कंपनी बनिहाल बायपासचे निर्माण करत आहेत. हे चार लेन जम्मू-काश्मीर राजमार्ग परियोजनेचा भाग आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरु केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष मोहम्मद सलिम भट यांच्या कार्यालयाच्या जवळच हा हल्ला झाला आहे. जवळच एक मदरसा असून त्याच्या काचा फुटल्या असल्याची माहिती आहे. स्फोटावेळी सोळा वर्षाचा मोहम्मद आकिब मदरशाच्या जवळच उभा होता. त्यामुळे तोही जखमी झाला.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दगडसदृश्य वस्तू कंपनीच्या शेडवर पडल्याचं त्यांनी पाहिलं. अधिकाऱ्यांनी स्फोटामागील नेमकं कारण अजून सांगितलेलं नाही. पण, याप्रकरणी तपास केला जात असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBBS Admission: एकाच छताखाली वैद्यकीय शिक्षणाचे धडे; ‘सकाळ विद्या’ आणि ‘वे टू ॲडमिशन’ यांच्यातर्फे पाच शहरांत होणार चर्चासत्र

UP: योगी सरकारकडून १७ कंपन्यांना हिरवा कंदील; २ हजार कोटींची गुंतवणूक आणि १० हजार नोकऱ्यांचा धमाका!

बायको Irritate झाली तर काय करायचं? भाऊ कदम यांनी सांगितलं सिक्रेट, म्हणाले...

Latest Marathi News Live Update: प्रकाशक प्रशांत आंबी बुलढाण्यात स्थानबद्ध

Whatsapp News : फक्त 4 महिने उरले! 8 सप्टेंबरपासून 'या' मोबाईलवर व्हॉट्सॲप बंद; कंपनीचा मोठा निर्णय, पाहा यादीत तुमचा फोन आहे का?

SCROLL FOR NEXT