wedding sakal
देश

GF सोबत जाताना झाला अपघात; हॉस्पिटलमध्ये दाखल केलं अन् तिथंच लावलं लग्न

सकाळ डिजिटल टीम

आपल्या प्रेयसीला फिरायला घेऊन गेला, रस्त्यामध्येच अपघात झाला. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण हे प्रकरण घरी कळालं आणि आपलं प्रेम आपल्यापासून दूर गेलं तर? पुढच्या गोष्टी व्हायच्या आधी प्रियकराने हॉस्पिटलमध्येच आपल्या प्रेयसीसोबत लग्न लावलं. सगळे डॉक्टर्स आणि रूग्ण हे वऱ्हाडी. ऐकून आपणही आश्चर्यचकित व्हाल.पण हो. हे खरं आहे. हा प्रकार घडला आहे बिहारमध्ये. सध्या सोशल मीडियावर या लग्नाची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

नीरज कुमार असं या तरूणाचं नाव असून तो आपल्या कौशल्या नावाच्या प्रेयसीला फिरायला घेऊन गेला होता. बिहारमधील बैदराबाद येथील बाजारात तो कौशल्याला फिरायला घेऊन गेला असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दोघेही जबर जखमी झाले. त्यानंतर दोघांनाही एकाच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि नीरजने आपल्या प्रेयसीला तिथेच माळ घातली.

ज्यावेळी त्यांच्यावर उपचार चालू होता त्यावेळी त्यांचे नातेवाईक त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर सर्व नातेवाईकांची ओळख एकमेकांशी झाली आणि या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याची त्यांची खात्री झाली. त्यानंतर त्यांनी या दोघांचे लग्न लावून देण्याचं ठरवलं आणि तसंच झालं. यावेळी सर्व कर्मचारी, नर्स, डॉक्टर आणि रूग्ण हजर होते. त्यामुळे सर्व देशात हे लग्न चर्चेचा विषय ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT