Breaking the rules at the quarantine center will result in a murder charge Assam news 
देश

खबरदार! क्वारंटाईन सेंटरमधील नियम मोडले तर खुनाचा गुन्हा दाखल होणार

वृत्तसंस्था

गुवाहाटी- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यात आसामचा समावेश आहे. आसाममध्ये विलगीकरण कक्षात रुग्णांनी गोंधळ घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे स्वास्थमंत्री हिंमत बिस्वा सरमा यांनी विलगीकरण कक्षात गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच हा अजामीनपात्र गुन्हा असेल असं मंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षात उपक्रव घालणाऱ्या रुग्णांना कडक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काही दिवसांपूर्वी बोंगाईगाव आणि चिरांग जिल्ह्यातील विलगीकरण कक्षात कोरोनाग्रस्त रुग्णांनी उपद्रव घातल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या, गोंधळ घालणाऱ्या कंटकांना थेट अटक केली जाईल. तसेच त्यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होईल, असं सरमा म्हणाले आहेत. त्याबरोबर विलगीकरण कक्षात काही अडचण असेल तर रुग्ण थेट त्यांना संपर्क करु शकतात, असंही ते म्हणाले आहेत.
----------
पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न
-----------
बोंगाईगांव जिल्ह्यातील विलगीकरण कक्षातील रुग्णांनी जेवणाच्या दर्जावरुन आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातल्याचा आरोप आहे. तसेच चिरांग जिल्ह्यातील विलगीकरण कक्षातील कोरोनाबाधित रुग्णांनी तेथून पलायन केले होते. त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांनीही निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे अशा रुग्णांवर चाप लावणे आवश्यक होते. यापार्श्वभूमीवर आसाम सरकारणे अशा लोकांविरोधात कडक पवित्रा घेतला आहे.

आसामच्या अन्य इतर भागांमध्येही कोरोनाबाधित रुग्णांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. गोलाघाटमध्ये काही रुग्ण मनाई असताना परिसरात थुंकत होते. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत होती. आसाममध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात आयपीसी 260 आणि 270 नुसार गुन्हा दाखल केला जातो. या दोन्ही कलमाअंतर्गत आरोपीला जामीन मिळू शकतो. दोषी आढळल्यानंतर 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Poland Defense: पोलंडमध्ये फ्रान्सची लढाऊ विमाने तैनात

Navaratri 2025: यंदा नवरात्रीत क्लासी ‘स्टाइल स्टेटमेंट’ महिलांना खुणावताहेत वेगवेगळ्या रंगांच्या साड्या अन् घागरा

Chinchwad Crime : चिंचवडमध्ये टेम्पो चालकाला लुटले; गुन्हेगारांना अटक

हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मित्रांनी घातलं फेविक्विक, ८ जणांना रुग्णालयात केलं दाखल

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

SCROLL FOR NEXT