Narendra Modi
Narendra Modi esakal
देश

दहशतवादाच्या मुद्यावर 'राजकारण' करु नका; ब्रिक्स सदस्य राष्ट्रांना मोदींचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

चीननं आयोजित केलेल्या 14 व्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

चीननं आयोजित केलेल्या 14 व्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. कोरोनामुळं सलग तिसऱ्या वर्षी ब्रिक्सचं आयोजन साध्या पध्दतीनं करण्यात आलं होतं. परिषदेत पीएम मोदींनी अनेक मुद्द्यांवर आपलं मतं मांडलं. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) ब्रिक्स वर्च्युअल समिटमध्ये (BRICS Virtual Summit) म्हटलं की, सदस्य राष्ट्रांनी एकमेकांच्या सुरक्षेच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. दहशतवादाच्या मुद्यांवर परस्पर सहकार्य केलं पाहिजे. या संवेदनशील मुद्द्याचं 'राजकारण' केलं जाऊ नये, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

पाकिस्तानस्थित (Pakistan) दहशतवादी अब्दुल रहमान मक्की (Terrorist Abdul Rehman Makki) याला संयुक्त राष्ट्र समिती (UN Sanctions Committee) अंतर्गत आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा भारत आणि अमेरिकेचा संयुक्त प्रस्ताव चीननं रोखल्यानंतर, 'ब्रिक्स'मध्ये याबाबत चर्चा झाली. एका निवेदनात MEA नं (Ministry of External Affairs) शुक्रवारी समारोप झालेल्या दोन दिवसीय BRICS (ब्राझील-रशिया-भारत-चीन-दक्षिण आफ्रिका) शिखर परिषदेत पंतप्रधानांच्या सूचना आणि टिप्पण्यांचा तपशील प्रदान केला.

BRICS सदस्य म्हणून आपण एकमेकांच्या सुरक्षेच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि दहशतवाद्यांना घोषित करण्यात परस्पर सहकार्य केलं पाहिजे. या संवेदनशील मुद्द्याचं राजकारण केलं जाऊ नये, असं MEA नं नमूद केलं. मक्की हा भारतात विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचाराचा अवलंब करण्यासाठी तरुणांची भरती आणि कट्टरपंथी बनवत आहे. दरम्यान, ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी आफ्रिका, मध्य आशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि पॅसिफिक ते कॅरिबियनपर्यंत भारताच्या विकास भागीदारीवर प्रकाश टाकला, असंही MEA नं म्हटलं. BRICS जगातील पाच सर्वात मोठ्या विकसनशील देशांना एकत्र आणतं. जे जागतिक लोकसंख्येच्या 41 टक्के, जागतिक जीडीपीच्या 24 टक्के आणि जागतिक व्यापाराचं 16 टक्के प्रतिनिधित्व करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT