BRICS Summit 2023 
देश

BRICS Summit 2023: PM मोदींनी दक्षिण आफ्रिकेत साजरे केले रक्षाबंधन, भारतीय वंशाच्या महिलेने बांधली राखी

Sandip Kapde

BRICS Summit 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी आज (मंगळवार) संध्याकाळी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाने मोदींचे स्वागत केले. यावेळी हर हर मोदींचा नारा देण्यात आला.

दरम्यान आर्य समाज दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष अर्थी नानकचंद शानंद यांनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली. त्या म्हणाल्या, नरेंद्र मोदी आमच्यासाठी भावापेक्षा वडिलांसारखे आहेत. पंतप्रधान मोदी हे जग 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच एक पृथ्वी, एक कुटुंब म्हणून पाहतात. ते दक्षिण आफ्रिकेत मोठा बदल घडवून आणणार आहेत.

15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. त्यांच्या आगमनाने येथील अनिवासी भारतीय समुदाय  उत्साहित दिसत आहे. लोकांनी हर हर मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.

दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंग कार्यक्रमात सामील होणार

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश बनेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेतून चांद्रयान-3 सॉफ्ट लँडिंग कार्यक्रमात सामील होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

Pune Airport Traffic Update : विमानतळ परिसरात वाहतूक बदल; दोन मार्गांवर एकेरी वाहतूक लागू!

Pune Election : दुबार नावे; चुकीची नोंदणी आणि त्रुटींचा भडिमार; मतदार यादीवर ९ हजार हरकतींचा पाऊस!

Ahmedabad Sports Hub: मोठ्या क्रीडा स्पर्धा दिल्ली-मुंबईऐवजी अहमदाबादला का होतात? हे शहर क्रीडा केंद्र कसे बनले? जाणून घ्या कारण...

Talegaon Election : तळेगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ५०० हून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त!

SCROLL FOR NEXT