देश

Dance Video - ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर नववधुचे जबरदस्त ठुमके

स्वत:च्या लग्नात एका इव्हेंटमध्ये डान्स करताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मिडियावर काही पोस्ट केल्यानंतर काही काळातच त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस सुरु होता. आजकाल बऱ्याच इव्हेंट, कार्यक्रमांचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत असतात. हल्ली लग्नातील अनेक क्षण टिपणारे उत्तम व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकीच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. हा व्हिडिओ आहे एका नवरीचा. यात ती आपल्या मैत्रिणींसोबत एंजॉय करताना दिसत आहे. स्वत:च्या लग्नात एका इव्हेंटमध्ये डान्स करताना दिसत आहे. नवरीबाईचा हा जबरदस्त डान्सचा व्हिडोओ व्हायरल झाला आहे. नवरीबाई आणि तिच्या मैत्रिणींनी कुली नंबर 1 चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळतं. व्हिडिओमधील या तरुणीचे नाव सोविना चावला असे आहे. तिचा हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले असून कमेंट्सही केल्या आहेत. व्हिडिओमध्ये नवरीबाई आणि तिची गर्ल गँग (मैत्रिणी) गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ग्रुपचा हा खास डान्स तिथे उपस्थित इतर लोकही एन्जॉय करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये लोक टाळ्या वाजवताना आणि शूटिंग करताना दिसतात. हा डान्स सोशल मीडिया यूजर्सला इतका आवडला आहे की लोकांनी तो इतर प्लॅटफॉर्मवरही शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: अनेक मार्ग बंद, तर 'या' रस्त्यांवर नो पार्किंग झोन; अनंत चतुर्दशीला पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल, जाणून घ्या...

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट विक्रीला सुरूवात; जाणून घ्या कसे खरेदी करता येणार, किंमत किती

Stock Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; निफ्टी 24,734च्या खाली, कोणते शेअर्स वाढले?

Madhya Pradesh : आता लाडक्या भावांचा नंबर, राज्य सरकार देणार मजुरांना दरमहा ५०००, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये ४५५ पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा? पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT