देश

भर मांडवात नवराई रुसली; होणाऱ्या पतीचा केला असा अपमान

नाराज नववधूचा प्रताप; video पाहून व्हाल हैराण

शर्वरी जोशी

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. त्यामुळे या दिवसाच्या प्रत्येक आठवणी आपण जपून ठेवत असतो. परंतु, या लग्नसमारंभात अशाही काही घटना घडतात ज्यांची आठवणही आपल्याला सहन होत नाहीत. यात अनेकदा सासरकडील मंडळींचे रुसवे-फुगवे, आपापसातील वाद पाहायला मिळतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या लग्नसोहळ्यात चक्क नवराईच रुसून बसली आहे. विशेष म्हणजे तिने रागाच्या भरात जे कृत्य केलं ते पाहू नवरदेवाला नक्कीच राग आला असेल. पण, तो व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला हसू अनावर होईल हे नक्की. (bride-is-in-anger-denied-to-give-sweet-to-groom-video-viral)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक नवरी चांगलीच रुसली असून तिने रागाच्या भरात चक्क आपल्या होणाऱ्या नवऱ्याचाच अपमान केला आहे. भरमांडवात नववधूने केलेलं हे वर्तन पाहून उपस्थित सगळीच मंडळी अवाक् झाली आहे.

नेमकं काय केलं वधूने?

लग्नसोहळ्यातील काही विधी सुरु असल्यामुळे स्टेजवर नववधू व नवरदेव दोघंही उभे होते. सोबतच त्यांचे आप्तेष्ट आणि मित्रपरिवारदेखील त्यांच्या बाजूला घोळका करुन उभा होता. यावेळी नवरदेवाला मिठाई भरवण्याची वेळ आली. त्यामुळे उपस्थित सगळ्यांनी नवरीला ही मिठाई भरवण्याचा आग्रह केला. मात्र, आधीपासूनच नाराज असलेल्या वधूने रागाच्या भरात ही मिठाई भरवण्याऐवजी चक्क त्याच्यासमोर फेकून दिली. विशेष म्हणजे तिच्या या वागण्यावरुन हे लग्न तिच्या मनाविरुद्ध होतंय का असा प्रश्न उपस्थितांमध्ये निर्माण केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हे लग्न मुलीच्या मनाविरुद्ध होतंय का? असा प्रश्न विचारला आहे. तसंच तिने नेमकं असं का केलं असावं? हा प्रश्नदेखील नेटकऱ्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT