Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singh esakal
देश

Brij Bhushan Singh: 'पंतप्रधान म्हणाले तर तातडीने राजीनामा देईन', बृजभूषण सिहांच्या विधानाने आश्चर्य

संतोष कानडे

Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात रेसलर्स दिल्लीच्या जंतर-मंतरवर आठवड्याभरापासून धरणे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्या पैलवान महिलांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

'एपीबी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत बृजभूषण सिंह बोलत होते. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला त्याचं मी स्वागत करतो. मला माहितंय की मी निर्दोष आहे. तपासकार्यात मी सहकार्य करणार आहे.

राजीनाम्याच्या प्रश्नावर बृजभूषण म्हणाले की, राजीनामा देत नाहीये त्याचं कारण या लोकांनी माझ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या आरोपांचा अपराधी बनून कसं राहणार? शिवाय त्यांनी कधीच राजीनामा मागितला नाही. त्यांची विधानं नेहमी बदलत आहेत, असंही बृजभूषण म्हणाले.

या आंदोलनाच्या पाठीमागे षड्यंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, याच्यामागे काही शे कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि दीपेंद्र हुड्डाच्या सोबत एक मोठा उद्योगपती असल्याचं बृजभूषण म्हणाले. तसेच माझ्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांचा काही पुरावा असेल तर दाखवा, मी राजीनामा देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं तर तुम्ही राजीनामा देणार का? या प्रश्नाचं उत्तर देतांना बृजभूषण म्हणाले की, तर लगेच राजीनामा देईन. फक्त पंतप्रधानच नाही तर अमित शाह, जेपी नड्डा यांच्यापैकी कुणीही सांगितलं तरी राजीनामा देईन, असं बृजभूषण यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

SCROLL FOR NEXT