Brijbhushan Sharan Singh sakal
देश

Brijbhushan Sharan Singh : ब्रिजभूषणशरण सिंह यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता

भाजपचे खासदार व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषणशरण सिंह यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भाजपचे खासदार व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषणशरण सिंह यांच्या कायदेशीर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ब्रिजभूषण यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे निरीक्षण अतिरिक्त महानगर न्याय दंडाधिकारी प्रियांका राजपूत यांनी नोंदविले. दुसरीकडे ब्रिजभूषण यांनी मात्र आपण महिला कुस्तीपटूंशी गैरवर्तणूक केली नसल्याचा दावा केला आहे.

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गेल्या महिन्यामध्ये ब्रिजभूषण यांच्याविरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. खासदार सिंह यांच्यावर पाच महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दिल्लीतील अतिरिक्त मुख्य महानगर न्याय दंडाधिकारी प्रियांका राजपूत यांच्यासमोर आज खासदार सिंह यांनी आपले म्हणणे मांडले.

दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात विनयभंग, लैंगिक शोषण, महिलांचा पाठलाग करणे याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात एका पीडिताने केलेल्या आरोपातून ब्रिजभूषण यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यांचे स्वीय साहाय्यक विनोद तोमर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात न्या. राजपूत यांनी खासदार ब्रिजभूषणशरण यांची या प्रकरणात अधिक चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT