Raj Thackeray  Sakal
देश

"कधी एअरपोर्टवर भेटले तर दाखवीन हिसका"; बृजभूषण यांचा राज ठाकरेंना इशारा

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित करूनही बृजभूषण सिंह यांचा विरोध कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. आपल्याला अयोध्या दौऱ्यात अडकवण्यासाठी सापळा रचण्यात आल्याचं कारण देत त्यांनी हा दौरा स्थगित केला आहे. या दौऱ्याला तीव्र विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांच्यामुळेच दौरा रद्द केल्याच्याही चर्चा सातत्याने होत आहेत. दरम्यान, हा दौरा स्थगित होऊनही बृजभूषण शांत बसलेले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. (Raj Thackeray Ayodhya Visit)

देवरिया इथल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज ठाकरेंच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन. राज ठाकरेंचं आता हृदय परिवर्तन झालंय आणि त्यांना अयोध्येला यायचं आहे. पण उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. आम्ही सगळेच रामाचे वंशज आहोत आणि त्यांनाच राज यानी अपमानित केलं आहे, मारलं आहे. त्यामुळे जेव्हा ते माफी मागतील, तेव्हाच येऊ शकतील. (Brijbhushan Singh on Raj Thackeray)

बृजभूषण सिंह पुढे म्हणाले की, राज ठाकरे ज्या कोणत्या उत्तर भारतीय राज्यात जातील, तिथे त्यांना विरोध केला जाईल. माफी मागितल्याशिवाय त्यांना प्रवेश नाही. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, पण नंतर त्यांनी आपला दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतरही बृजभूषण सातत्याने राज ठाकरेंना विरोध करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT