dhananjaya y. chandrachud Sakal
देश

CJI Dhananjaya Chandrachud: 'सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्या!' CJI चंद्रचूड यांचं न्यायाधीश, वकिलांना मार्गदर्शन

‘कायदेशीर प्रणाली मजबूत करण्याच्या दृष्टीने न्यायाधीश व वकील यांच्यातील सहकार्य कसे वाढवावे’ या विषयावर त्यांनी रविवारी मार्गदर्शन केले

सकाळ डिजिटल टीम

‘‘न्याय व्यवस्थेतील काळा कोट आणि गाऊन प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देतो. म्हणूनच घटनाकारांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सद्सद्विवेकबुद्धीला अनुसरून न्यायाधीश व वकिलांनी योग्य समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा,’’ असे आवाहन सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले. (Latest Marathi News)

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ प्रशासनातर्फे आयोजित ‘कायदेशीर प्रणाली मजबूत करण्याच्या दृष्टीने न्यायाधीश व वकील यांच्यातील सहकार्य कसे वाढवावे’ या विषयावर त्यांनी रविवारी मार्गदर्शन केले.

या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक, न्या. दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्ना वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय व्ही. गंगापूरवाला, औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ न्यायाधीश रवींद्र घुगे, राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष उदय वारुंजीकर, उपस्थित होते. सुरुवातीलाच चंद्रचूड यांनी मराठीतून मराठवाड्यातील संत परंपरेचा उल्लेख करीत निजामाविरुद्धच्या लढ्यातील स्वातंत्र्यवीरांचा नामोल्लेख केला.(Latest Marathi News)

न्यायव्यवस्थेत आता तंत्रज्ञानाचा अवलंब ही काळाची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सुमारे ३६ हजार निवाडे ‘ईएसईआर’ प्रणालीवर मराठीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले. त्याचा लाभ वकील व न्यायाधीशांनी घ्यावा. ज्येष्ठ वकिलांनी वकिली व्यवसायात येणाऱ्या तरुणपिढीला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. तसेच विधी विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य करून तरुण वकिलांना प्रशिक्षित करावे, असे डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT