manish sisodia pm modi ed congress sharad pawar politics
manish sisodia pm modi ed congress sharad pawar politics sakal
देश

Manish Sisodia : इंग्रजांनी स्वातंत्र्यसैनिकांनाही त्रास दिला, पण...; सिसोदियांचा जेलमधून भाजपला टोला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - ईडीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक केली. दिल्लीतल्या दारु घोटाळ्यामध्ये सिसोदिया यांचं नाव आलेलं आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांना सीबीआयने अटक केली होती. ईडीने चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. आता जेलमधून सिसोदिया यांनी एक संदेश जारी केला आहे.

मला तुरुंगात टाकून साहेब मला दुखवू शकतात, पण ते माझे धाडस तोडू शकत नाहीत, इंग्रजांनीही स्वातंत्र्यसैनिकांना त्रास दिला, पण त्यांचे मनोबल तुटले नाही, असे सिसोदिया म्हणाले. सिसोदिया यांच्या ट्विटर हँडलवरून हा संदेश जारी करण्यात आला.

मद्यधोरण तयार करण्यामागे षडयंत्र असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी कोर्टात केला होता. त्याचे नियम बदलून ठराविक लोकांना ६ टक्क्यांऐवजी १२ टक्के लाभ देण्यात आला. मनीष सिसोदिया यांनी यासंबंधीचे डिजिटल पुरावेही डिलीट केल्याचं सीबीआयने म्हटलं.

मद्यधोरणाचा हा निर्णय मंत्रिगटाचा असल्याचे सांगण्यात आले असले, तरी वस्तुस्थिती अशी आहे की, एका व्यक्तीशिवाय इतर कोणालाही याची माहिती नव्हती, असे ईडीने आपल्या युक्तिवादात म्हटले आहे. या संपूर्ण सिंडिकेटचे नेतृत्व विजय नायर करत असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT