rishi sunak and wife akshata murthy  
देश

Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या पत्नीला भारतीय कंपनीकडून मिळणार तब्बल ६८ कोटी; कारण...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली- ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्या खात्यात लवकरच ६८.१७ कोटी रुपये जमा होणार आहेत. हे उत्पन्न त्याच्या वडिलांच्या कंपनीतून मिळणार आहे.

मूर्ती यांना भारतातील दुसऱ्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी इन्फोसिसमधील शेअर्सच्या माध्यमातून लाभांशात वाटा मिळणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले असून सुमारे ५७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या भागधारकांना १७.५० रुपये प्रति शेअर दराने लाभांश (इन्फोसिस लाभांश) देण्याची घोषणा केली आहे.

सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता यांचे इन्फोसिसकडे ५ डिसेंबरपर्यंत ३.८९ कोटी शेअर्स होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी कंपनीने प्रति शेअर १७.५० रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे, त्यामुळे अक्षता यांनी २ जून 2022 पर्यंत आपले शेअर्स कायम ठेवले तर त्यांना ६८.१७ कोटी रुपये मिळतील. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२मध्ये जाहीर केलेल्या १६.५० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांशासह त्यांना १३२.४ कोटी रुपये मिळाले होते.

यापूर्वी इन्फोसिसने गेल्या आर्थिक वर्षात प्रति शेअर ३१ रुपये लाभांश दिला होता, ज्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीला एकूण १२०.७६ कोटी रुपये मिळाले होते. मुंबई शेअर बाजारातील सध्याच्या मार्केटरेटनुसार अक्षता यांच्या शेअर्सची किंमत ५ हजार ४०० कोटींपेक्षा अधिक आहे. इन्फोसिस ही भारतातील सर्वाधिक लाभांश देणाऱ्या कंपन्यांपैकी एक मानली जाते.

लाभांशाच्या घोषणेनंतर संपूर्ण नारायण मूर्ती कुटुंबाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर त्यांना लाभांश देयकातून एकूण 264.264 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.. लाभांशासाठी पात्र भागधारकांच्या यादीत संस्थापक नारायण मूर्ती, त्यांची पत्नी सुधा एन मूर्ती, त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि त्यांची मुलगी अक्षता मूर्ती यांचा समावेश आहे. अक्षता यांचे पती ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत जे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT