BRO now impart skills lessons to its own employees Training to build roads tunnels arunachal pradesh sakal
देश

बीआरओ देणार आता स्वतःच्या कर्मचाऱ्यांना कौशल्याचे धडे

रस्ते व बोगद्यांच्या निर्मितीसाठी बीआरओच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

अक्षता पवार

अरुणाचल प्रदेश : सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) वतीने आता थेट कर्मचाऱ्यांनाच रस्ते, बोगदे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. यामुळे आता बीआरओला विविध प्रकल्पांसाठी खासगी कॉन्ट्रॅक्टर यांच्या ऐवजी संपूर्णपणे प्रकल्प पूर्तता विभागीय पातळीवर करणे शक्य होणार आहे. आत्मनिर्भर अंतर्गत हा प्रयोग करण्यात येत असून याचा भविष्यात बीआरओला अत्यंत फायदा होणार आहे. सीमावर्ती भागात लष्कराची हालचाल सुरळीत व्हावी, अत्यंत दुर्गम भागात त्यांना लागणारे संसाधने पोहचावे यासाठी लष्करी वाहनांना सहजपणे प्रवास करता यावा म्हणून बीआरओ मार्फत लष्करासाठी अत्यंत चांगल्या दर्जाचे रस्ते, बोगदे, पुल आदी सुविधा पुरविण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते.

अरुणाचल प्रदेश येथे ही बीआरओचे अनेक प्रकल्प सुरू असून यासाठी खासगी कॉन्ट्रॅक्टर यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर स्थानिक नागरिक दैनंदिन उत्पन्नासाठी मजूर, अभियंता म्हणून अशा प्रकल्पांमध्ये काम करतात. आत्मनिर्भर भारत संकल्पाने अंतर्गत बी आर ओ सध्या ' बीआरओ विभागीय बोगदा ' उपक्रम राबवत आहे. याबाबत अरुणाचल येथे बीआरओच्या बोगदा प्रकल्पांचे संचालक कर्नल परिक्षीत मेहरा यांनी सांगितले, "हा बोगदा विभागीय पातळीवर तयार करण्यात येत आहे. हा १०५ मीटर लांब आणि ८.५ मीटर रुंद आहे.

यामध्ये सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर बोगदा साकारण्याचे कौशल्य बीआरओच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शिकविणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. सध्या या बोगद्याचे काम सेला- चाबेला मार्गावर सुरू आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नक्कीच आता विभागीय पातळीवर कौशल्य प्रशिक्षण देणे सोपे होत आहे."

कसा होणार फायदा

  • महत्त्वाच्या वेळी मजुरांच्या प्रतिक्षेची वात पाहण्याची गरज नाही

  • छोट्या मोठ्या प्रकल्पांसाठी खासगी कॉन्ट्रॅक्टरची आवश्यकता नसेल

  • बीआरओच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अशा प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी

  • त्यांना देखील अशा कामाचे कौशल्य आत्मसात करता येईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: सोलापूर जिल्ह्यात पुन्हा आला वाघ! 'धामणगावतील शेतकऱ्याच्या गायीची शिकार'; गायीचा हंबरडा अन्..

Chakan News : देवीचा भुत्या म्हणून सेवा करताना मुलांना दिली उच्च शिक्षणाची दिशा; दिवटीच्या प्रकाशातील शिक्षणाने उजळले भविष्य

Aadhaar PAN Link : मोठी बातमी ! 'या' लोकांचे आधार अन् पॅन कार्ड १ जानेवारी पासून डिअ‍ॅक्टिवेट होणार, आजच करा 'हे' काम

Malshiras Crime : पहिल्या प्रियकराने काढला प्रेयसीच्या पतीचा काटा; राजेवाडीत तरुणाचा कोयत्याने वार करून खून

Mumbai : निवडणुकीआधी ठाकरेंना धक्का, तेजस्वी घोसाळकर भाजप प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT