BRO Tourism Portal  Team eSakal
देश

BRO Tourism Portal चं राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

सीमावर्ती भागातील रस्ते, बोगदे आणि विकासकामांना भेटी देण्याचा पर्यटकांचा मार्ग मोकळा होणार.

सुधीर काकडे

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी गुरुवारी पर्यटन पोर्टल लॉन्च केलं. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या सीमावर्ती भागात असलेल्या रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पर्यटनासाठी ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी पर्यटकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात, फक्त अटल बोगद्याच्या सहलीसाठी आणि रोहतांगसाठी या पोर्टलद्वारे ई-बुकिंग उपलब्ध असेल. तर लवकरच लडाख, जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमधील पर्यटन स्थळांचा देखील या उपक्रमांतर्गत समावेश केला जाईल, असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं.

उमलिंग-ला-पास येथील जगातील सर्वात उंच रस्ता, अत्याधुनिक टु-लेन सेला बोगदा आणि नेचिफु बोगदा या प्रकल्पांचं पर्यटन पोर्टलद्वारे ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, गेल्या सहा दशकांमध्ये 60,000 किलोमीटरहून अधिक रस्ते, 850 मोठे पूल, 19 धावपट्ट्या आणि चार बोगदे बांधले, त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत.

“पूर्वी, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला कधीही प्राधान्य दिलं जात नव्हतं, कारण कठीण काळात आमच्या विरोधकांकडून त्याचा गैरवापर होण्याची भीती होती. आम्ही हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे,” असंही राजनाथ सिंह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT