Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

eKYC deadline for Mukhyamantri Ladki Bahin Yojana: जाणून घ्या, आता eKYC साठी अंतिम तारीख काय निश्चित करण्यात आली?
Government announces extension of the eKYC deadline for Mukhyamantri Ladki Bahin Yojana, allowing beneficiaries more time to complete verification.

Government announces extension of the eKYC deadline for Mukhyamantri Ladki Bahin Yojana, allowing beneficiaries more time to complete verification.

esakal

Updated on

Government Extends eKYC Deadline for Ladki Bahin Yojana: राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अखेर अपेक्षेप्रमाणे महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांच्या eKYC साठी मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

सरकारने आता लाडक्या बहिणींना त्यांची eKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत जाहीर केली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील लाखो लाडक्या बहिणांना सरकारने एकप्रकारे दिलासच दिला आहे.

खरंतर ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांची नावे योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळली जाणार होती. शिवाय, ई-केवायसीची मुदतीचा १८ नोव्हेंबर २०२५ हा शेवटचा दिवस होता. मात्र तरीही राज्यातील जवळपास २.३५ कोटी लाभार्थींपैकी तब्बल १.३ कोटी महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नव्हती. ही संख्या मोठी असल्याने सरकार मुदतवाढ देण्याच्या विचारात आहे, अशा चर्चा सुरू होत्या.

Government announces extension of the eKYC deadline for Mukhyamantri Ladki Bahin Yojana, allowing beneficiaries more time to complete verification.
Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

 शिवाय, राज्यात नगरपरिषद, नगरपंचायत आणि लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांची घोषणाही केली आहे. तर अशावेळी सरकारला राज्यातील महिलावर्गाचा मतदानातील वाढता टक्का बघता, त्यांना नाराज करणे परवडणार नव्हते. अखेर महायुती सरकारने या योजनेस मुदतवाढ जाहीर करत, लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा खूश करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

Government announces extension of the eKYC deadline for Mukhyamantri Ladki Bahin Yojana, allowing beneficiaries more time to complete verification.
Fake Tiger and Real Tiger Viral Video : खतरनाक!!! वाघाचं कातडं पांघरून जंगलातील वाघाच्या तोंडासमोर गेला पठ्ठ्या अन् मग...

मंत्री आदिती तटकरेंनी काय सांगितलं ? -

 गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Government announces extension of the eKYC deadline for Mukhyamantri Ladki Bahin Yojana, allowing beneficiaries more time to complete verification.
Elon Musk X Chat Messaging App : इलॉन मस्कने लाँच केलं X Chat! ; आता ‘WhatsApp’ अन् ‘Arattai’ला जबरदस्त टक्कर

तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com