uttar pradesh crime esakal
देश

थरार! पत्नीने हात धरले आणि भावाने गळा कापला; अनैतिक संबंधामुळे घेतला जीव

सकाळ डिजिटल टीम

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादमध्ये एक थरारक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून भावानेच भावाचा गळा कापला. तेही भावाच्या पत्नीच्या मदतीने. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

गाझियाबादमधल्या लोणी येथील खुशहाल पार्क कॉलनीमध्ये ही घटना घडली. कपड्यांवर कलाकूसर करणारे कारागिर अय्याज (वय ३५) यांची हत्या झाली. अय्याज यांचे भाऊ आमीर आणि त्यांची पत्नी सजरा खातून यांनी हे क्रूर कृत्य केलं.

आमीर आणि सजरा यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र अय्याज यांचा या अनैतिक संबंधांना विरोध होता. दोघांचं बोलणं बंद करण्यासाठी सात दिवसांपूर्वी अय्याज यांनी सजराकडून मोबाईल हिसकावून घेतला होता. त्यामुळे त्या दोघांनी त्याला मारण्याचा प्लॅन केला. आमीर बुरखा घालून आला आणि साजराने घराचा दरवाजा उघडला. दोघांनी मिळून अय्याजचा जीव घेतला.

खुनाचा घटनाक्रम

पोलिसांनी केलेल्या चौकशीतून दोन्ही खुन्यांचा क्रूरपणा पुढे आलाय. आमिरने पोलिसांना सांगितलं की, त्यांना घराच्या बाहेरची लाईट बंद करताच साजराने दरवाजा उघडला. ठरल्याप्रमाणे ती त्याची वाटच बघत होती. त्यावेळी अय्याज त्याच्या रुममध्ये झोपला होता. सुरुवातीला त्याचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा मृत्यू झाला नाही. मग साजराने अय्याजचे हात धरले आणि आमिरने गळ्यावरुन चाकू फिरवला. याप्रकरणी पोलिसांनी आमिर आणि साजराला ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT