brother falls in love with real sister both run away from home and married at up 
देश

बहिणीवरच जडले प्रेम अन् केला विवाह, पण...

वृत्तसंस्था

बरेली (उत्तर प्रदेश): एका कुटुंबामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सख्खा भाऊ व बहिणीने पळून जाऊन विवाह केला. विवाहानंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशात बहिण-भावाच्या विवाहामुळे चर्चेला उधान आले आहे. परंतु, दोघांच्या विवाहामुळे कुटुंबिय व नातेवाईकांना तोंड लपविण्याची वेळ आली आहे. वडिलांनी मुलगा व मुलीच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बरेली शहरातील मोहम्मदी परिसरामध्ये एक कुटुंबिय राहात आहे. दांपत्याला एक मुलगा व चार मुली आहेत. दोन मुलींचा विवाह झाला आहे. बहिण-भावाचे प्रेमसंबंध सुरू झाले. दोघांनी पळून जाऊन विवाह केला. विवाहानंतर नातेवाईकांमध्ये जाऊ शकत नसल्यामुले दोघांनी दिल्लीला पळून जाण्याच्या विचार केला. दोघांनी विवाह केल्याची माहिती कुटुंबियांना समजली. वडिलांनी दोघांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात दिले तर मुलाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय त्यागी यांनी दिली.

दरम्यान, बहिण व भावाने आमचा विवाह दुसरीकडे ठरवल्यास आत्महत्या करू, अशी धमकी दिल्यामुळे कुटुंबिय त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT