Madhya Pradesh Shocker 
देश

'पतीपेक्षा दीर हँडसम, तोच सुंदर मुलगा देऊ शकेल म्हणून महिला घरातून पळाली, सासरच्यांनी गाठलं पोलीस स्टेशन

Woman runs away with brother in law in MP: धक्कादायक म्हणजे पत्नी आपल्या दीरासोबतच पळून गेली आहे. याप्रकरणी पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे.

कार्तिक पुजारी

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. सुंदर मुलगा हवा म्हणून पत्नीने पतीला धोका दिला आहे. धक्कादायक म्हणजे पत्नी आपल्या दीरासोबतच पळून गेली आहे. याप्रकरणी पतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने पतीला फोन करून आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पतीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पती आणि नातेवाईकांनी न्यायाची मागणी केली आहे. नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, महिलेचे दीरावर प्रेम जडले होते. तसेच, सुंदर मुलगा व्हावा या इच्छीने ती दीरासोबत पळाली आहे.

छतरपूर शहरातील सीताराम कालोनी येथील हा प्रकार आहे. राजेन्द्र कुशवाहा यांनी आपल्या आईसोबत पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं आणि त्याठिकाणी तक्रार केली. राजेन्द्र कुशवाहा यांच्या आईने सांगितलं की, माझी सून दीरासोबतच पळून गेली आहे. ती त्याच्यावर प्रेम करत होती. तिचे लग्न होऊन १३ वर्ष झाले आहेत. पण, तिला मुलगा झाला नाही. सूनेचं म्हणणं होतं की, तिचा पती सुंदर नाही. त्यामुळे तिला सुंदर मुलगा होणार नाही. त्यामुळे ती पतीकडून मुलगा होऊ देणार नाही.

राजेन्द्र कुशवाहा यांच्या आईने पुढे सांगितलं की, 'माझा छोटा मुलगा आणि सूनेचे लैंगिक संबंध होते. त्यांना संबंध ठेवण्यास रोखण्यात आले होते, पण त्यांनी ऐकलं नाही. ते दोघे पळून गेले.' पत्नी मेसेज करून आत्महत्या करण्याची धमकी देत आहे. मी काही केलं तर त्याची जबाबदारी सासरच्या लोकांवर असेल असं ती म्हणत आहे. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो आहोत, असं पती म्हणाला आहे.

याप्रकरणी एसपी विक्रम सिंह यांनी म्हटलं की, महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई केली जात असून महिला आणि तिच्या दीराचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT