BS Yeddyurappa
BS Yeddyurappa  
देश

पाकवरील हवाई हल्ल्यांमुळे भाजपच्या जागा वाढतील: येडीयुरप्पा

वृत्तसंस्था

बंगळूर : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यांमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने वारे वाहत असून, आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपला 28 पैकी 22 जागा मिळतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

येडियुरप्पा म्हणाले, की भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे दिवसेंदिवस देशभरात भाजपचे वारे जोरात वाहू लागले आहेत. पक्षही मजबूत होत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून आपण कारवाई केल्यामुळे मोदींच्या समर्थनार्थ देशात चांगले वातावरण आहे. याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. आम्हाला विश्वास आहे, की आम्ही कर्नाटकमध्ये 22 जागांवर नक्कीच विजय मिळवू. 

कर्नाटकमधील 28 लोकसभा जागांवर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 17, काँग्रेस 9 आणि जेडीएसने दोन जागांवर विजय मिळविला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-जेडीएस आघाडीविरुद्ध भाजप अशी लढाई होणार आहे. 

हवाई हलाने बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यांबाबत आक्रमक वक्तव्ये न करण्याची किंबहुना अधिकृत प्रवक्ते वगळता अन्य नेत्यांना काहीही न बोलण्याची व बोलल्यास अत्यंत काळजीपूर्वक बोलण्याची तंबी भाजप नेतृत्वाने स्वपक्षीय मंत्री, आमदार, खासदारांसह अन्य नेत्यांना दिली आहे. तरीही पक्षाचे मंत्री व नेते आगाऊ बोलण्याचे थांबत नाहीत हा अनुभव आहे. याउपरही जे बोलत आहेत किंवा बोलतील त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत तिकीट गमवावे लागण्याचा स्पष्ट संकेत भाजपने दिला आहे. आता त्यात येडियुरप्पा यांनी हे वक्तव्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT