BSF_Channi 
देश

"हा थेट संघराज्यावर हल्ला"; पंजाबच्या CMचा केंद्रावर हल्लाबोल

केंद्राला हा निर्णय तातडीने मागे घेण्याची केली विनंती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचं (BSF) अधिकार क्षेत्र तीन सीमावर्ती राज्यांसाठी वाढवण्यात आल्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हा थेट संघराज्यावर हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ट्विटद्वारे चन्नी म्हणाले, आंतरराष्ट्रीय सीमेवरील ५० किमीच्या पट्ट्यात बीएसएफला अतिरिक्त अधिकार बहाल करणं म्हणजे देशाच्या संघराज्य पद्धतीवर हल्ला आहे. भारत सरकारच्या या एकतर्फी निर्णयाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. माझी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की त्यांनी तातडीने हा तर्कहीन निर्णय मागे घ्यावा.

दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी बीएसएफच्या अधिकारांत वाढ - केंद्र

केंद्रानं बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे बीएसएफला अतिरिक्त अधिकार प्राप्त होणार आहेत. याद्वारे त्यांना भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमांपासून भारताच्या बाजूने ५० किमी पर्यंत शोध मोहिमा राबवणे, संशयीतांना अटक करणे तसेच जप्तीच्या कारवाई करता येणार आहेत. दहशतवाद आणि सीमेपलिकडून होणारे गुन्हे रोखण्यासाठी तसेच शून्य सहिष्णुता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT