BSP chief Mayawati names her nephew Akash Anand as her successor  
देश

BSP Successor: बसपा प्रमुख मायावती यांचा उत्तराधिकारी ठरला; भाच्याला मिळणार संधी!

बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला असल्याची माहिती मिळत आहे. मायावती यांचा भाच्चा अकाश आनंद हे मायावती यांचे उत्तराधिकारी असतील असं सूत्रांनी सांगितलं.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला असल्याची माहिती मिळत आहे. मायावती यांचा भाच्चा अकाश आनंद हे मायावती यांचे उत्तराधिकारी असतील असं सूत्रांनी सांगितलं. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (BSP chief Mayawati names her nephew Akash Anand as her successor)

रविवारी एक मोठी घडामोड पाहायला मिळाली. बसपा प्रमुख Bahujan Samaj Party (BSP) आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी आपला भाच्चा अकाश आनंद याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. माहितीनुसार, रविवारी पक्षाच्या बैठकीत लखनऊमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.

अकाश आनंद यांनाच उत्ताधिकारी म्हणून संधी मिळेल अशी चर्चा होती. त्यानुसार आता त्यांना बसपा प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळावी लागणार आहे. गेल्या वर्षांपासूनची पक्षातील महत्वाच्या घडामोडींबाबत ते निर्णय घेत होते अशी माहिती आहे.

उत्तर प्रदेशात बसपाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.या बैठकीत मायावती यांनी आपल्या पक्षाची जबाबदारी अकाश आनंद यांना सोपवली. उच्चर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता सर्व देशामध्ये त्यांना पक्षाची जबाबदारी संभाळण्यास सांगण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT