bsp mp danish ali says was trying to save dignity of pm post refutes bjp provocation claim mp ramesh budhari case  
देश

Danish Ali : भाजप खासदाराला भडकवल्याच्या दाव्यावर दानिश अलींनी सोडलं मौन; म्हणाले, मी पंतप्रधानपदाची...

रोहित कणसे

भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी संसदेत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधीपक्षांकडून केली जात आहे. यादरम्यान बसपा खासदार दानिश अली यांच्यावर त्यांनी भाजप खासदाराला भडकावल्याचे आरोप केले जात आहेत. मात्र दानिश अली यांनी या प्रकरणात मौन सोडलं असून सोशल मीडीया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हीडोओ पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये दानिश अली यांनी भाजप नेते चुकीचे नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. मात्र सत्य हे आहे की, मी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा वाचवण्याचे काम केले आहे असेही ते म्हणाले आहेत.

बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी पोस्टमध्ये लिहीलं की, भाजपचे काही नेते नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न खरत आङेत की मी खासदार रमेश बिधूडी यांना भडकावले. पण सत्य हे आहे की मी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी काम केले आणि सभागृहाच्या कामकाजातून मोदींशी संबंधित अत्यंत आक्षेपार्ह शब्द काढून टाकण्याची मागणी सभापतींकडे केली होती.

दानिश अली यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये भाजप खासदार बिधूडी ये चांद्रयान-३ मिशनच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रेय देत आहेत. व्हिडीओत बिधूडी म्हणत आङेत की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ ची यशस्वी लँडींग झाली तर त्यांच्या (विरोधकांच्या) पोटात दूखू लागतं, की कशा प्रकारे एक गरीबाचा मुलगा एक चहा विकणारा... ज्याला कधी मौत का सौदागर तर कधी नीच म्हटलं जात... या लोकांना हे यश पचत नाहीये...

बिधूडी पुढे म्हणाले की, हे लोक प्रश्न विचारत आहेत की मोदींना श्रेय का घेत आहेत? मोगी श्रेय घेत नाहीयेत, श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. यानंतर मध्येच एक आवाज येतो आणि रमेश बिधूडी खूप चिडलेले दिसले. यानंतर त्यांनी लागोपाठ बीएसपी खासदार दानिश अली यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT