उत्तर प्रदेशसाठी बसपची पहिली यादी जाहीर; 100 नावांचा समावेश 
देश

उत्तर प्रदेशसाठी बसपची पहिली यादी जाहीर; 100 नावांचा समावेश

वृत्तसंस्था

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्षाने 100 उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी आज (गुरुवार) प्रसिद्ध केली आहे. या यादीत 34 मुस्लिम उमेदवारांचाही समावेश आहे.

यादीमध्ये रामपूर मतदारसंघातून नवाब क्वाझीम अली खान, चामारूवा मतदारसंघातून अली युसूफ अली, गुन्नूरमधून मोहम्मद इस्लाम खान आणि मुझफ्फरनगरमधून साईदा बेगम यांच्या नावाचा समावेश आहे. याशिवाय सहारनपूर येथून मुकेश दीक्षित, देवबंद येथून माजीद अली, कैराना येथून दिवाकर देशवाल, मेरठ कॅन्टोंमेंटमधून सत्येंद्र सोळंकी आणि मेरठ शहरातून पंकज जॉली यांच्या नावाचा समावेश आहे. यापूर्वी निवडणूक लढविलेले धरमपाल सिंह (इतमदपूर), राजा बाला (चापरौली), झाकीर अली (लोणी) आदी नावांचाही यादीत समावेश आहे.

उत्तर प्रदेशची विधनासभा ही 403 सदस्यांची आहे. बुधवारी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी 11 फेब्रुवारी पासून 8 मार्चपर्यंत सात टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमधील निवडणूकीसंदर्भातील घडामोडींनी वेग घेतला आहे. एका बाजूला समाजवादी पक्षासमोर अंतर्गत कलह निर्माण झालेले असताना नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाच्या आशा उंचावल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT