bsp mayavati
bsp mayavati esakal
देश

बसपच्या ‘हत्ती’ची चाल मंदावली; सातत्याने उतरता आलेख

सकाळ वृत्तसेवा

पक्षाध्यक्ष मायावती यांचे अस्तित्व जाणवत नसल्याने चर्चा; पक्षापुढे बिकट आव्हाने

‘बसप’पुढील(BSP) आव्हाने नवी नाहीत. २०१२मध्ये सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर पक्षाचा आलेख सातत्याने घसरत चालला आहे. २००७मध्ये २०६ जिंकणाऱ्या ‘बसप’ला २०१२ मध्ये ८० जागांवरच समाधान मानावे लागले होते. तेव्हा उत्तर प्रदेशमधील(uttar pradesh) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. पण २०१७मधील विधानसभा निवडणुकीचे निकाल पक्षासाठी आणखी निराशाजनक होता. त्यावेळी भाजपच्या भगव्या लाटेत ‘बसप’ केवळ १९ जागांवर तग धरु शकला. खराब कामगिरीमुळे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. यामुळे निर्माण झालेल्या चिंतेने मायावती यांना २०१९मधील लोकसभा निवडणुकीत कट्टर विरोधी समाजवादी पक्षाशी युती करणे भाग पडले. युती केली तरी उत्तर प्रदेशमध्ये ‘सप’ आणि ‘बसप’ भाजपचा मुकाबला करु शकले नाही. त्यावेळी ‘बसप’ची कामगिरी किंचित सुधारून पक्षाच्या पदरात दहा जागांचे दान पडले. (BSP's party slow down in up election Consistently descending graph)

मुख्य नेत्यांनी सोडली साथ

‘बसप’ कमजोर होत असतानाच नेत्यांच्या निष्ठाही बदलत गेल्या. २०१७मध्ये विधानसभेत पक्षाचे १९ आमदार होते, ती संख्या आता फक्त तीन झाली आहे. ज्या १६ आमदारांनी पक्षाची साथ सोडली, त्यातील सुखदेव राजभार यांचे २०२१ मध्ये निधन झाले. इतरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली किंवा राजीनामा देऊन ते बाहेर पडले. ‘बसप’च्या बड्या नेत्यांपैकी एक असलेले आणि माजी खासदार राकेश पांडे यांनी नुकताच समाजवादी पक्षाचा हात धरला आहे.

तज्ज्ञांच्या मते...

  1. मायावतींच्या निष्क्रियतेचा लाभ कोणाला होणार हे आताच सांगता येणार नाही

  2. उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर वेगवगळ्या मतदारसंघात नवी समीकरणे तयार होतील

  3. मायावती यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू दलित मतदार आहे. त्यात जाटव परंपरागत मतदार मानले जातात

  4. जाटव समाजातील लोक ‘हत्ती’चे चिन्ह पाहून मतदान करतात

  5. यंदाही हा मतदार मायावतींबरोबर राहण्याची शक्यता

  6. जाटव वगळता दलित समाजातील अन्य जातींमध्ये मतांची विभागणी शक्य

  7. ब्राह्मणांसह ओबीसी मतपेढीला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न

  8. ‘बसप’ करीत असला तर या दोन्ही समाजाची मते ‘सप’ आणि भाजपलाही मिळू शकतात

मतपेढी विखुरली

मायावती(mayawati) यांचा ‘सोशल इंजिनिअरिंग’चा(experiment of social engineering) प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला होता. दलित, ब्राह्मण आणि मुस्लिमांच्या मतांवर बहुमतावर स्वार झालेल्या मायावतींच्या ‘हत्ती’ची चाल सध्या मंदावली आहे. ‘बसप’ची मतपेढी काही वर्षांपासून दुरावत आहे. मागील काही निवडणुकांमध्ये(up election 2022) उत्तर प्रदेशमध्ये दलित मतांमध्ये विशेष करून जाटवांची मते पक्षाच्या विरोधात गेल्याचे दिसते. भाजपच्या सुधारलेल्या कामगिरीमागे हे एक कारण सांगितले जाते. एकेकाळी ‘बसप’चा हक्काचा मतदार असलेला ग्रामीण आणि दलित मतदारांना आपल्याकडे वळविण्याची भाजपची खेळी चांगलीच यशस्वी ठरल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT