Budget 2024  esakal
देश

Budget 2024 Agriculture: कृषी क्षेत्रात ५५ लाख नवीन रोजगारनिर्मिती करण्याचा संकल्प; अर्थमंत्री म्हणाल्या...

Budget 2024 Speech: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी संसदेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राला अधिक पुढे नेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, कृषी क्षेत्राताल स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेती क्षेत्रामध्ये ५५ लाख नवीन रोजगार निर्माण केले जाणार आहेत. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या माध्यमातून ३८ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आणि १० लाख रोजगार निर्मिती झाली.

पुढे बोलताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, शेतकऱ्यांची पीक कापणी झाल्यानंतर होणारं नुकसान टाळणं गरजेचं आहे. पीक काढणीनंतरचे नुकसान टाळण्यासाठी योजनांवरही काम केले जात आहे. त्यासाठी आम्ही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यासाठी करत आहोत. त्यासाठी तेलबिया उत्पादनाच्या अभियानाला बळ दिले जाईल. या अंतर्गतच नवीन कृषी तंत्रज्ञान आणि कृषी विम्याला चालना दिली जाणार आहे.

याशिवाय दुग्धव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांनाही मदत केली जाईल. राष्ट्रीय गोकुळ मिशनसारख्या योजना राबवल्या जात आहेत. सरकाकरकडून मत्स्य संपत्तीही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सीफूड उत्पादन दुप्पट झाले असून मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून उत्पादकता तीन ते पाच टन प्रति हेक्टर वाढवली जाईल. त्यामुळे 55 लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असं अर्थमंत्री म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune land deal: मुंढवा जमीन गैर व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना क्लिन चीट, दोषी कोण? अहवालात काय म्हटलं?

नेवासे तालुका हादरला! 'सदस्यांच्या छळाला कंटाळून पदाधिकाऱ्याने जीवन संपवले'; शिक्षण संस्थेच्या सहा सदस्यांवर गुन्हा, चिठ्ठीत काय दडलयं?

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT