Budget 2024 Memes Esakal
देश

Budget 2024 Memes: हमको जिंदा ना छोडो! सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला अन् X वर आला मजेदार 'मीम्स'चा पूर

Sitharaman presented the budget and X was flooded with funny 'memes': अर्थसंकल्प सादर होत असतानाच सोशल मिडीया एक्स(X) वरती #Budget2024 हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. 2024 चा अर्थसंकल्प अशा वेळी आला आहे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 1 फेब्रुवारी रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर केला. त्या अर्थसंकल्पीय भाषण करत असतानाच लोकांनी सोशल मीडियावर अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावरही मोठ्या संख्येने लोकांनी मीम्स शेअर केले आहेत.

लोक स्वत:साठी करदाते या नात्याने काही महत्त्वांच्या घोषणा होतात का याची वाट पाहत होते. या वेळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #Budget2024 मोठ्या प्रमाणावर हॅशटॅग ट्रेंड करत होता. या दरम्यान मीम्स देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहेत.

2024 चा अर्थसंकल्प अशा वेळी आला आहे, जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. आता भारताचे ध्येय 'आत्मनिर्भर' अर्थव्यवस्था आहे. अर्थसंकल्पाचा हा काळही महत्त्वाचा आहे. कारण, याच वर्षी लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. सरकारकडून जनतेच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पात करदात्यांना कोणतीही नवीन सूट देण्यात आलेली नाही. यावरती देखील मीम्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत.

Viral Meme On Budget 2024

जेव्हा लोकांना आयकरात कोणताही बदल न झाल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांची निराशा होऊ लागली. जी अनेकांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करून व्यक्त केली आहे.

याचा अर्थ आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्टार्टअपसाठी कर सवलत एका वर्षासाठी वाढवण्यात आली आहे.

Viral Meme On Budget 2024

कोणतीही नवीन कर सूट न मिळाल्याने लोक नाराज असताना, लक्षद्वीपच्या घोषणेने ते आनंदी दिसले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, 'देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी, लक्षद्वीपसह आमच्या बेटांवर कनेक्टिव्हिटी, पर्यटन पायाभूत सुविधा आणि सुविधांसाठी प्रकल्प सुरू केले जातील.'

याबद्दल लोकांनी आनंद व्यक्त केला. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली तेव्हा मालदीवचे नेते भारताविरोधात बोलू लागले. या कारणास्तव लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकून लक्षद्वीपला जाण्याचा सल्ला दिला.

Viral Meme On Budget 2024

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT