bullet proof modi jacket  
देश

VIPच्या सुरक्षेसाठी आता बुलेटप्रुफ 'मोदी जॅकेट'; बंदुकीच्या गोळ्याही होतात निष्प्रभ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - सुरक्षा रक्षकांसाठी बुलेट प्रूफ जॅकेट्स, सेफ्टी कपडे आदी तयार करणार्‍या ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरीच्या (ORP), ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेडने वजनाने हलके आणि कमी किंमतीत मिळणारे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे. हे नवीन जॅकेट फॅशनेबलही आहे. या जॅकेटमुळे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लोकांची संरक्षणाचा स्तर सुधारण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिधान करत असलेल्या जॅकेटसारखीच या जॅकेटची रचना असून त्याचे वजन 3 किलो आहे.

कंपनीने हे जॅकेट 'पोलीस एक्स्पो'मध्ये प्रदर्शनासाठी ठेवले होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पाहता या जॅकेटला 'मोदी जॅकेट' असे नाव देण्यात आले आहे. या जॅकेटचे वैशिष्ट्य म्हणजे हे कमी वजनाचे असून पॉइंट 9 एमएम पिस्तुलमधून 10 मीटर अंतरावरून झाडलेली गोळी या जॅकेटमध्ये आत जाऊ शकत नाही. (bullet proof modi jacket)

दिल्लीतील आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय पोलीस एक्स्पोच्या पहिल्या दिवशी फायर आर्म्स, ड्रोन, बुलेट प्रूफ जॅकेट, सायबर सिक्युरिटी, मोबाईल फॉरेन्सिक, काउंटर ड्रोन, सशस्त्र वाहने यांसारखी उपकरणे प्रदर्शित करण्यात आली होती. 18 देशांतील 350 हून अधिक कंपन्या या एक्स्पोमध्ये सहभागी झाल्या आहेत.

एक्स्पोचे आयोजक मुकेश खारिया म्हणाले की, हा कार्यक्रम पोलीस, कायदा सुव्यवस्था अधिकारी, सुरक्षा एजन्सींना जागतिक दर्जाच्या आणि देशांतर्गत उत्पादकांशी जोडण्याची संधी देईल. भारत, यूके, अमेरिका, इस्रायल, जर्मनी, फ्रान्स, दुबई, यूएई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया, स्पेन, इटली, डेन्मार्क आणि स्वीडन या देशांतील कंपन्या या एक्स्पोमध्ये सहभागी झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : भाजप-शिवसेना मुंबईत सत्तेच्या उंबरठ्यावर... फक्त एवढ्या जागांची गरज

मुंबईत पहिला विजय काँग्रेसचा, भाजपचे नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर विजयी; आतापर्यंत कुणी मारली बाजी?

Kolhapur Election Breaking News : सतेज पाटलांना तगडा झटका, हायव्होल्टेज लढतीत शारंगधर देशमुख विजयी; महायुतीचा सर्व जागांवर विजय

Pune Municipal Corporation Election Results : पुण्यात पहिल्या निकालात भाजपने मारली बाजी; तीन उमेदवार विजयी, राष्ट्रवादीला एक जागा

Nagpur Municipal Election Results 2026 : नागपूर महापालिकेचे पहिले कल समोर, भाजपची मुसंडी, तब्बल ६५ जांगावर आघाडी

SCROLL FOR NEXT