Indian Army esakal
देश

दिल्लीत काडतुसे, कोलकात्यात अनधिकृत ड्रोन; केंद्रीय यंत्रणा 'हायअलर्ट'वर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी काडतुसांची तस्करी केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली. तसेच कोलकाता येथे स्वातंत्र्य दिनापूर्वी व्हिक्टोरिया मेमोरियलवर ड्रोन उडवल्याबद्दल दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. (Bullets found in Delhi, news in Marathi)

याबाबत पूर्व परिक्षेत्राचे सहाय्यक पोलीसआयुक्त विक्रमजीत सिंग यांनी सांगितले की, काडतुसांच्या दोन पिशव्या लखनौला पुरवायच्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल नावाचा एक गुंड, जो सध्या मेरठ तुरुंगात आहे, तो या कारवाईत सहभागी होता. अनिलने उत्तराखंडच्या डेहराडून येथील गण हाऊसमधून जौनपूरचा रहिवासी सद्दाम याच्यासाठी काडतुसांची व्यवस्था केली होती.

आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सहामध्ये गन हाऊसचा मालक आहे. यात गुन्हेगारी नेटवर्कचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असला तरी, यात दहशतवाद्यांचा सहभाग आहे का याची शक्यताही तपासली जात आहे.

6 ऑगस्ट रोजी आनंद विहार परिसरात एका ऑटो चालकाने एका पोलीस हवालदाराला संशयास्पद स्थितीत जड बॅग घेऊन जाणाऱ्या दोन पुरुषांची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काडतुसे जप्त केली. रशीद आणि अजमल अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी गन हाऊसचा मालक परीक्षित नेगी याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT