Burqa-clad woman, identified as YouTuber Gunja Kapoor, detained at Shaheen Bagh 
देश

शाहीनबागेत आलेल्या बुरखाधारी महिलेची पटली ओळख; मोदीही करतात ट्विटरवर फॉलो

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात शाहीनबागेत सुरू असलेल्या आंदोलनास्थळी बुरखा घालून फिरत असलेल्या महिला यूट्युबरला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आज पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी एकच खळबळ उडाली होती. गुंजा ही मोबाईल फोनद्वारे छुप्या पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचा संशय काही महिला आंदोलकांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ताब्यात घेण्यात आलेल्या संबंधित महिलेची ओळख पटली असून, गुंजा कपूर असे तिचे नाव आहे. ती "राईट नॅरेटिव्ह' नावाचे यूट्युब चॅनल चालवते; तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुंजा हिला ट्विटरवर फॉलो करत असल्याचेही समोर आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, गुंजा ही आंदोलनस्थळी संशयितरीत्या फिरत होती. आंदोलक महिलांना ती सातत्याने विविध प्रश्न विचारत होती. ती युट्यूबर असल्याचे काही महिला आंदोलकांनी ओळखल्यानंतर तिला पकडण्यात आले. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. 

गुंजा हिला सरिता विहार पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. तिथे तिची संपूर्ण ओळख पटविण्यात आली. तिची चौकशी केल्यानंतर तिला सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर गुंजा हिने निवेदनात म्हटले आहे की, तीन फेब्रुवारी रोजी वृत्तवाहिनीवरील वादविवादाच्या कार्यक्रमासाठी जामिया मिलिया विद्यापीठात गेल्यानंतर आपल्याशी बोलण्यास कोणीही तयार नव्हते. तेथून 20 मिनिटांत आपल्याला बाहेर जावे लागले. त्यामुळे आपण बुरखा घालून शाहीनबागेत जाऊन तेथील महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. आपल्या यूट्युब चॅनेलसाठी एक स्टोरी करण्यासाठी आपण शाहीनबागेत गेले होते, असा दावाही तिने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT