esakal
देश

मृतांच्या आकडेवारीत लपवाछपवी, कोर्टातच पितळ पडलं उघडं

नामदेव कुंभार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहा:कार माजवलाय. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील परिस्थिती तर अतिशय भयावह आहे. येथील लोक गंगा (Ganga) नंदीमध्ये कोरोना मृतदेह सोडत आहेत. तसेच नदी किनाऱ्याला वाळूतही शेकडो मृतदेह पुरल्याचं समोर आलं आहे. येथील आरोग्य व्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्यामुळेही हाय कोर्ट (High Court) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बिहारमध्ये कोरोना मृतदेहाचे आकडे लपवल्याचं पितळ कोर्टातच उघडं पडलं आहे. पाटना उच्च न्यायालयात कोरोना मृतदेहाच्या सुनावणीवेळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पाटना कोर्टात कोरोनावरील (Patana High Court) सुनावणीदरम्यान प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमुळे सर्वजण चकीत झाले आहे. बिहारचे (Bihar) मुख्य सचिव आणि पाटना आयुक्त यांनी कोर्टात सादर केलेल्या बक्सरमधील कोरोना मृताच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत दिसून आली आहे. दोघांमधील मृताची आकडेवारी वेगळी आली आहे.

मुख्य सचिवांच्या रिपोर्टनुसार, एक मार्च ते 13 मे दरम्यान कोरोनामुळे बक्सरमध्ये फक्त सहा जणांचा मृत्यू झाला. आयुक्तांच्या रिपोर्ट्समध्ये 789 मृत्यूची नोंद आहे. दोन्ही रिपोर्ट समोर आल्यानंतर पाटाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजय करोल आणि न्यायाधीश कुमार यांनी यावर राज्य सरकारला सुनावलं. मुख्य सचिव आणि आयुक्त यांच्या रिपोर्टमध्ये विरोधाभास जाणवल्यानंतर कोर्टानं चौकशीचे आदेश दिले आहेत. एक मार्च ते 13 मे यादरम्यान बक्सरमध्ये किती रुग्ण उपचाराधीन होते. तसेच या कालावधीत मृत्यू झालेल्यांची नावेही मागवली आहे. 19 मे रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान सर्व माहिती देण्याचा आदेश कोर्टानं दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

"दोनशे लोकांचं जेवण आणि घाईघाईत बुकिंग", 'सीजेपी'च्या व्हायरल व्हिडीओवर हॉटेल व्यवस्थापनाची प्रतिक्रिया

Pakistan Cricket: आधी वेस्ट इंडिजने जिरवली, आता ICC ने कारवाई केली! पाकिस्तानच्या दोन गोलंदाजांना झाली शिक्षा...

SCROLL FOR NEXT