Congress, Bjp  esakal
देश

ByPoll Result 2024: लोकसभेनंतर पोटनिवडणुकांमध्येही इंडिया आघाडीचा मोठा विजय; 13 पैकी १० जागा जिंकल्या

यामुळं इंडिया आघाडीला पुन्हा लोकांनी बळ दिल्याचं बोललं जात आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर सात राज्यांमधील १३ जागांसाठी पोटनिवडणूक पार पडली यांपैकी १० जागांवर इंडिया आघाडीनं विजय मिळवला आहे. तर केवळ एकच जागा भाजपनं जिंकली आहे. तर इतर दोन जागा अपक्षांनी राखल्या. यामुळं इंडिया आघाडीला पुन्हा लोकांनी बळ दिल्याचं बोललं जात आहे. (By Poll Result 2024 India bloc big win in by elections after Lok Sabha won 10 out of 13 seats)

पश्चिम बंगालमध्ये ४, हिमाचल प्रदेशात ३, उत्तराखंडमध्ये २, बिहार १, मध्य प्रदेश १, पंजाब १ आणि तामिळनाडूत १ या राज्यांमध्ये १० जुलै रोजी पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. तर आज या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये १३ जागांसाठी १२१ उमेदवार रिंगणात होते. यांपैकी १० जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या आहेत.

यामध्ये पश्चिम बंगालमधील सर्व चार जागा तृणमूल काँग्रेसनं जिंकल्या आहेत. हिमाचलमधील तीन पैकी दोन जागा काँग्रेसनं तर एक जागा भाजपनं जिंकली आहे. तसंच उत्तराखंडमधील दोन्ही जागा काँग्रेसनं जिंकल्या आहेत. बिहारमधील १ जागा अपक्ष, पंजाबमधील १ जागा आप, मध्य प्रदेशातील १ जागा भाजप आणि तामिळनाडूतील १ जागा डीएमके या पक्षांनी जिंकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT